बुलेट ट्रेन विरोधात गोदरेज कंपनीची न्यायालयात धाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |


मुंबई : मुंबई-अहमदाबाद दरम्यान उभारण्यात येत आलेल्या केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबईतील गृहनिर्माण कंपनी गोदरेजने आपला विरोध दर्शवला आहे. विक्रोळीतील मोक्याच्या जागी असलेले आपली जमीन गोदरेजने बुलेट ट्रेन प्रकल्पाला देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला असून याविरोधात गोदरेज कंपनीने सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली आहे. त्यामुळे सरकारचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोर्टकचेरीच्या वादात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

विक्रोळीमध्ये ऐनमोक्याच्या जागी गोदरेज कंपनीची ८.६ एकर जमीन आहे. ही जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देण्याची तगादा सरकारकडून कंपनीला लावण्यात येत आहे. याठिकाणी बुलेट ट्रेनच्या व्हेंटीलेशनसाठी डक्ट उभारण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवलेला आहे. त्यामुळे गोदरेजने ही जमिनी या प्रक्लपाला द्यावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु गोदरेजने ही मागणी धुडकावून लावत जमीन देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु प्रशासनाकडून सुरु असलेल्या मागणीला वैतागून गोदरेजने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान न्यायालयाने देखील या याचिकेवर सुनावणी करण्यास तयारी दर्शवली असून येत्या ३१ जुलैला यायाचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@