'शेतात किटक आणि तणनाशके फवारतांना काळजी घ्या' : जिल्हाधिकारी पाण्डेय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |

अकोला : शेतातील पेरण्यांची कामे पूर्ण झाली असून पिकांवर रोग पडू नयेत, म्हणून शेतकरी पिकांवर कीटकनाशक आणि तणनाशकांची फवारणी करत आहेत. परंतु यावेळी शेतकऱ्यांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून फिवारणी करताना शेतकरी आणि शेतमजुरांनी आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये पाऊस व्यवस्थितपणे सुरु झाला आहे. त्यामुळे सदयस्थितीला जिल्हयातील शेतकरी पिक पेरणीचे काम करत आहे. शेतक-याकडून झालेल्या पिक पेरणीवर येणारे किड आणि रोगावर किटकनाशके , तणनाशके फवारणी करण्यात येत आहे. परंतु हे काम करितांना शेतकरी आणि शेतमजूर यांच्याकडून योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्याने तसेच अनेकांना याबाबत योग्य ती माहिती नसल्याने केव्हाही कोणतीही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे शेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना नागरिकांनी आवश्यक ती सर्व प्रकारची काळजी घ्यावी, असे आवाहन पाण्डेय यांनी केले आहे. तसेच जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याकडे लक्ष देऊन नागरिकांना याविषयी माहिती द्यावी, असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

गेल्या वर्षी यवतमाळमध्ये पिकांवर औषध फवारणी करत असताना १०० हून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. त्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणी वेळी केला जाणारा हलगर्जीपणा किती महाग पडू शकतो, हे समोर आले होते. त्यामुळे नागरिकांना कीटकनाशकांच्या फवारणीसंबंधी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@