कोणाचे पारडे जड हे मतदार ठरवतील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |

 
 
जळगाव :
महापालिका निवडणुकीत कुणाचे पारडे जड आहे हे मतदार ठरवतील. शिवसेनेचे उमेदवार मंगळवारपासून आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती माजीमंत्री व शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी दिली. त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. सुरेशदादा म्हणाले की, १९ प्रभागातील एकूण ७५ उमेदवारांची नावे निश्‍चित झाली असून, नावांची यादी मंगळवारी जाहीर केली जाईल. युतीसंदर्भात सायंकाळीपर्यंत तरी ठरले नव्हते. युतीच्या अनुषंगाने सकारात्मक सुरुवात झाली मात्र, नंतर फोडोफोडी सुरू झाली. यालाच ‘राजकारण’ म्हणतात. महाआघाडी करण्याची वेळ आता नाही. लोक काय विचार करतात याचा विचार आम्ही करतो, असेही सुरेशदादा म्हणाले.
 
सुरेशदादांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा
महापौर ललित कोल्हे व मनसे नगरसेवकांनी रविवारी भाजपात प्रवेश केला. याच धक्कातंत्राचा अवलंब करीत माजीमंत्री सुरेशदादा जैन हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये होती. सायंकाळी साडेआठ वाजेनंतर या चर्चेचा जोर ओसरला आणि माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे, माजी उपमहापौर सुनील महाजन प्रवेशासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली. सायंकाळी साडेपाच ते रात्री १० वाजेपर्यंत या प्रवेशांचीच चर्चा होती पण त्यात अंतिमतः काहीच तथ्य नसल्याचे समोर आले.
 
@@AUTHORINFO_V1@@