राज्यात आनंदी मंत्रालय सुरु करण्याचा विचार : चंद्रकांत पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : राज्यातील सर्व नागरिक सुखी आणि आनंदी राहावेत, यासाठी आता आनंदी मंत्रालय (हॅप्पी मिनिस्ट्री) सुरु करण्याचा आमचा विचार आहे. या अंतर्गत लोकांमध्ये सकारात्मक विचार वाढीस लागावेत, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच, यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबवले जातील. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
 
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ४८ व्या अभ्यासवर्गात गेल्या चार वर्षातील 'महाराष्ट्र गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे योगदान' या विषयावर ते बोलत होते. यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे देखील उपस्थित होते.
 
 
 
 
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पाटील म्हणाले की, राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून चार वर्षांत महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजानिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात प्रमुख्याने ७/१२ उतारे ऑनलाईन करणे, खड्डेमुक्त महाराष्ट्राची मोहीम, छोट्या वाहनांना टोलमुक्ती आदी महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. तसेच, विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या काळामध्ये अशा प्रकारची व्याख्याने आयोजित करणे हे अतिशय आव्हानात्मक काम असते. मात्र, अशा प्रकारच्या व्याख्यानमालांमधून आम्हाला देखील तरुण पिढी कशा प्रकारे इन्फॉर्मेटिव्ह आहे, याची माहिती मिळत असते.
 
त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमधूनच महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा राज्यकारभार कशा प्रकारे चालतो, हे जवळून जाणून घेण्याची संधी मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@