कचरा न उचलण्याच्या निर्णयास ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |



आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री-आयुक्त चर्चेनंतर घेतला निर्णय

ठाणे: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शहरातील ५ हजार चौ.मी.पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली गृहसंकुले तसेच १०० किलोपेक्षा जास्त घनकचरा निर्माण करणार्‍या व्यावसायिक आस्थापनांचा कचरा न उचलण्याच्या निर्णयाला ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या चर्चेअंती नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ हजार चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणार्‍या गृहसंकुलांनी तसेच दररोज १०० किलो कचरा निर्माण करणार्‍या व्यावसायिक संकुलांनी आपल्या स्तरावर कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबत यंत्रणा निर्माण करण्याबाबत निर्देशित केले होते.

 

त्यानुसार केंद्र शासनाच्या स्तरावर नोटिफिकेशन काढून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने अशा गृहसंकुलांचा आणि वाणिज्य आस्थापनांचा कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला होता. तथापि पावसाळा सुरू झाल्याने आणि कचरा न उचलण्यामुळे शहरात साथ किंवा रोगराई पसरू नये तसेच पावसाळ्यात गृहसंकुलांना अशी यंत्रणा उभारण्यास अनेक अडचणी येत असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळा संपेपर्यंत या निर्णयाला मुदतवाढ देण्याबाबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सदर निर्णयाला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.  दरम्यान याबाबत मध्यममार्ग काढण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे सर्व पदाधिकारी, गृहसंकुलांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@