सिद्धिविनायक युवा संस्थेची किल्ले सफर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |


 

टिटवाळा : सिद्धिविनायक युवा संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या विविध गडकिल्ल्यांंची माहिती आजकालच्या युवकांना व्हावी, त्यांना त्यांचे मूल्य कळावे, यासाठी गडकिल्ल्यांना भेटी देण्याची मोहीम गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी किमान ३ ते ४ वेगवेगळे किल्ले पाहण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ही मोहीम राबविण्यात येते. याच मोहिमेच्या अनुषंगाने रविवार ८ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या कार्ला येथील इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बुद्ध लेणी व लोहगड या किल्ल्यांना भेट देण्यात आली.
 

संपूर्ण निसर्गरम्य वातावरणात घाट रस्त्यावर मोटरसायकलवर प्रवास करून लोणावळा, कार्ला व लोहगड येथे पोहोचणे व सुखरूप मागे येणे हा अतिशय चित्तथरारक अनुभव होता. त्यातदेखील सर्व मोटारसायकलस्वारांची मानसिक व शारीरिक क्षमता तपासून त्यांना या मोहिमेसाठी तयार करण्यात आले होते. सर्वात आधी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन तसेच वेगावर मर्यादा ठेऊन टिटवाळा येथील सिद्धिविनायक युवा संस्थेचे अध्यक्ष विनायक कोळी, क्रीडाप्रशिक्षक हरिश वायदंडे व संतोष मुंढे या साहसी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जाधव, समाधान कोंडावळे, साहिल कातडे, आदित्यन जयवेल, चंद्रकांत जाधव, अक्षय व बशराज हरसिंगे या ११ युवकांनी निसर्गरम्य वातावरणात एका दिवसात २५० किमी लांबीचा मोटरसायकल प्रवास करून ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.

@@AUTHORINFO_V1@@