मुंबईतील शाळांना ३ दिवसांची सुट्टी जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |

 
 
मुंबई : मुंबई येथे पावसाने थैमान घातल्यामुळे सगळ्यात जास्त त्रास भोगावा लागतोय तो म्हणजे चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत शासनाने मुंबई येथील शाळा आणि महाविद्यालयांना ३ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
 
आज मुंबई येथे पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे जनतेचं जनजीवन पूर्णपणे विस्खळित झाले आहे. मुंबई-ठाण्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतील काळी शाळांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आलेली आहे. मात्र असे प्रसंग पुन्ह घडू नये यासाठी शाळांना ३ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक शाळांना शनिवार रविवार सुट्टी असते, त्यामुळे आता कदाचित सर्व विद्यार्थी पुढच्या सोमवार पासूनच शाळेत जाऊ शकतील.
 
दरम्यान या पावसामुळे रेल्वे गाड्यांचा देखील खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य आणि हार्बरवरील लोकलदेखील अर्धा तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे कार्यालयांमध्ये जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ लागेल असे दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@