देशातील ६ प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सार्वजनिक क्षेत्रातील ३ व खाजगी क्षेत्रातील ३ अशा भारतातील एकूण ६ शैक्षणिक प्रतिष्ठित संस्थांची नावे जाहीर केली असून यात आयआयटी मुंबईचा समावेश आहे. 
 
 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ट्विट करून देशातील ६ प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांच्या नावांची घोषणा केली. मंत्रालयाच्या वतीने नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने देशातील सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या ६ शैक्षणिक संस्थांची निवड केली आहे. जागतिक गुणवत्ता क्रमवारीत स्थान मिळविण्यासाठी या संस्थांना केंद्र शासनाकडून पुढील ५ वर्षांसाठी १ हजार कोटींचा निधी प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली आहे. 
 
 
देशातील सर्वोच्च ३ शासकीय शैक्षणिक संस्थेत आयआयटी मुंबई
 
देशातील सर्वोच्च गुणवत्ताप्राप्त तीन शासकीय शैक्षणिक संस्थाची निवड करण्यात आली आहे. यात आयआयटी मुंबई (महाराष्ट्र), आयआयटी दिल्ली(दिल्ली) आणि आयआयएससी बंगळुरु (कर्नाटक) चा समावेश आहे.यासह खाजगी क्षेत्रातील मनिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (कर्नाटक), बिट्स पिलानी(राजस्थान) आणि जिओ इन्स्टिट्यूट या तीन शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. 
 
 
या प्रतिष्ठित संस्था होणार विविध सुविधांनी सज्ज 
 
 
जगातील पहिल्या १०० किंवा २०० शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील एकाही संस्थेचा समावेश नसल्याने केंद्र शासनाने आता या क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांना स्थान मिळवून देण्यच्या दिशेने पावले टाकत यासाठी ६ शैक्षणिक संस्थांची निवड केली आहे. सध्या देशात एकूण ८०० विद्यापीठ असून यातील ६ अभिमत विद्यापीठ दर्जाप्राप्त शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@