मुंबईवर आस्मानी संकट; पुढील दोन दिवस राहणार जोर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |


 

मुंबई : मुंबई उपनगरात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सलग चौथ्या दिवशीही मुंबईवरील हे आस्मानी संकट कायम असून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक भाग जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

पावसाचे अपडेट

 

- उपनगरातील पुलांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच ठाणे-भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला तडे गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

 

- मुसळधार पावसामुळे रेल्वेसह विमानसेवेवरही परिणाम झाल्याचे दिसत असून ७२ विमान उड्डाणांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

 

- मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवा आजही काही ठिकाणी ठप्प असून तर तिन्हीही मार्गावर लोकलसेवा सुमारे अर्धा तास उशिराने धावत आहे.

 

- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळा-महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी नसल्याचे जाहीर केले होते. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना तर मुंबईतीलही काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

- कळवा पूर्व येथील जमीन खचल्याने तीन घर कोसळले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर प्रशासनाने नाल्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी गरज पडल्यावरच घराबाहेर पडावे, असा इशारा महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने दिला आहे.

@@AUTHORINFO_V1@@