उमवि प्रवेशद्वारासमोरील खड्डा ठरतोय घातक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |

वाहनधारकांना करावी लागतेय जीवघेणी कसरत, प्रशासनाचे दुर्लक्ष

 
जळगाव :
बांभोरी येथील महामार्ग क्रमांक ६ च्या कडेला असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर महामार्गावर मोठा खड्डा पडला आहे. यामुळे येथून जाणार्‍या वाहनधारकांसाठी हा खड्डा घातक ठरत असून वाहन चालवितांना जीवघेणी कसरत करावी लागते आहे. हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत असून प्रशासनाने याकडे गंभीरतापूर्वक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समोरील महामार्गावर पडलेल्या या खड्ड्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवितांना कसरत करावी लागत आहे. खड्डा चुकवितांना मागून येणार्‍या वाहनाने धडक देण्याची शक्यता असते. वाहन चालवितांना खड्ड्याचा अंदाज लवकर येत नसल्यामुळे खड्डा चुकवितांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्डा चुकवितांना एक वाहनधारक थोडक्यात बचावल्याचाही प्रसंग नुकताच घडून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यामुळे प्रशासन याठिकाणी मोठा अपघात घडण्याची वाट पहात आहे का? असा संतप्त प्रश्नही जनतेकडून उपस्थित होत आहे. महामार्गाच्याकडेला विद्यापीठ तसेच विविध महाविद्यालये आहेत. त्यामुळे महामार्गावरुन दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ये-जा करतात. अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असते. ती भरधाव वेगाने जातात. अवजड वाहने, महामार्गावरील खड्डे, साईड पट्ट्यांचा अभाव यामुळे वाहन चालवावी कशी, असा प्रश्‍न वाहनचालकांना भेडसावत आहे
 
 
साईडपट्टया होणे गरजेचे
विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील महामार्गाच्याकडेला साईडपट्टया होणे गरजेचे आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठ प्रशासनाने बस थांब्याची गेल्यावर्षी व्यवस्था केली आहे. या खड्डयामुळे बसचालकाला वाहन धुळ्याकडून येणार्‍या वाहन धारकांसाठी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर साईडपट्टी नसल्यामुळे बस चालकाला मोठी कसरत करून बस थांबवावी लागते. खड्ड्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज वाहनधारकांकडुन व्यक्त केली जात आहे. या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने अनेक निष्पाप जीवांचे आधीच बळी गेले आहे. त्यामुळे शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.
@@AUTHORINFO_V1@@