छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला, दोन जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात काल नक्षलवादी हल्ला झाला. या हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. काल संध्याकाळी बीएसएफच्या दलावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढविला या हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान शहीद झालेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात नक्षलवाद्यांकडून हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांना जवान देखील चोख प्रतिउत्तर देत आहेत. 
 
 
 
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आणि छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ले सतत सुरु आहे. या सगळ्या हल्ल्यांवर उपाय करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय गृहराज्य हंसराज अहिर यांची मागील काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली होती. या बैठकीत या सगळ्या हल्ल्यांवर काय उपाय करता येईल यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. मात्र अद्याप हे हल्ले कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@