असुरक्षित वातावरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018   
Total Views |


 

हिंसाचार, बेरोजगारी, अंतर्गत यादवी, गरिबी, युद्धजन्य परिस्थिती अशा विविध कारणांमुळे विस्थापित लोकांच्या यादीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. गेल्यावर्षी जवळपास दीड कोटी लोकांनी आपल्या मायभूमीला निरोप दिला. विकसनशील देशांमधील सर्वाधिक लोकांना आपली मायभूमी नकोशी वाटू लागली आहे. भारतामधून अमेरिकडेकडे निवारा मागणाऱ्या लोकांची संख्या २०१७ च्या अखेरपर्यंत ४० हजार ३९१ वर गेली आहे.

 

देश-परदेशातील जीवनशैली, प्रगत तंत्रज्ञान, व्यवस्थापन, शिक्षण अशा अनेक गोष्टींचं आकर्षण भारतीयांना वाटत असतं. परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेणाऱ्यांची संख्या आपल्याकडे लक्षणीय आहे. थोडक्यात भारतीयांवर पूर्वीपासूनच पाश्चिमात्य देशांचा प्रभाव अजूनही कायम टिकून आहे परंतु, अलीकडच्या काळामध्ये अनेक भारतीयांना आपला मायदेश सोडून अमेरिकेमध्ये कायमचे वास्तव्य करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याकडे भारतीय तसेच इतर देशांचा कल वाढत असल्याची कारणे आता बदलली असल्याचे दिसून येत आहे.

 

एका अहवालानुसार, तब्बल सात हजार भारतीय नागरिकांनी अमेरिकेमध्ये कायमचा निवारा मिळविण्यासाठी अर्ज केल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये त्या-त्या देशामध्ये राहणाऱ्यांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासित एजन्सीच्या (रिफ्युजी एजन्सी) ताज्या अहवालानुसार जगाच्या पाठीवरील निर्वासितांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार २०१७ च्या अखेरपर्यंत तब्बल ६.८ कोटी लोक जगभरातून आपली मायभूमी सोडून परांगदा झाले आहेत. हिंसाचार, बेरोजगारी, अंतर्गत यादवी, गरिबी, युद्धजन्य परिस्थिती अशा विविध कारणांमुळे विस्थापित लोकांच्या यादीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. गेल्यावर्षी जवळपास दीड कोटी लोकांनी आपल्या मायभूमीला निरोप दिला. विकसनशील देशांमधील सर्वाधिक लोकांना आपली मायभूमी नकोशी वाटू लागली आहे. भारतामधून अमेरिकडेकडे निवारा मागणाऱ्या लोकांची संख्या २०१७ च्या अखेरपर्यंत ४० हजार ३९१ वर गेली आहे.

 

सध्याच्या काळात भारतामध्ये शरणार्थी लोकांची संख्या १ लाख, ९७ हजार, १४६ व निवारा मागणाऱ्या लोकांचा आकडा १० हजार ५१९ वर जाऊन पोहोचला आहे. अंतर्गत यादवीमुळे भीषण परिस्थितीला सामोरे जात असलेल्या अफगाणिस्तानमधून सर्वांधिक १ लक्ष २४ हजार ९०० लोकांनी जगभरामधील ८० देशांकडे आसऱ्यांची मागणी केली. त्याखालोखाल आर्थिक आघाड्यांवरील आव्हानात्मक परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या व्हेनेझुएलामधील २९ हजार ९०० लोक अमेरिकेतील आसऱ्यासाठी इच्छुक आहेत. म्यानमारमधून रोहिंग्यांना परागंदा होण्याची वेळ आल्याने बांगलादेशने त्यांना आश्रय दिला. ही संख्या ९ लक्ष ३२ हजार २०० इतकी आहे.

 

जगातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे. सीरिया, अफगाणिस्तान, इराक आदी देशांतील लोकांनी आपली दैना थांबविण्यासाठी मायभूमी सोडली. यासाठी अमेरिकेबरोबरच युरोपचादेखील आधार घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून युरोपमध्ये पंधरा लाख निर्वासितांनी प्रवेश केला आहे. सुरक्षित आयुष्य जगण्याकरिता हिंसाग्रस्त झालेल्यांच्या नजरा युरोपकडे लागल्या आहेत. तसेच निर्वासितांना आश्रय देणारे काही विकसनशील देश त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठविण्याची धमकी देत आहेत. जगभरातील खरंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून अडचणीत असलेल्यांची मदत करणे, त्याला आसरा देणे हे आपले कर्तव्य आहे परंतु, बाहेरच्या देशांमधून अमेरिका किंवा इतर देशांमध्ये सतत विस्थापितांनी स्थलांतर केले तर मग त्या देशाची व्यवस्था विस्कळीत होऊ शकते, ही बाबदेखील आपण समजून घेतली पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@