जून महिन्यामध्ये राज्यात समाधानकारक पाऊस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पाणी साठ्यांमध्ये वाढ





मुंबई : गेल्या ९ तारखेला राज्यात आलेल्या मान्सून राजाने जून महिन्यामध्ये राज्यात समाधानकारक हजेरी लावली असून जून महिन्याअखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागाने दिली आहे. जलसंपदा विभागाने नुकतीच याविषयीची ताजी आकडेवारी जाहीर केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जूनअखेरच्या पाण्यासाठी १.५ टक्यांनी वाढ झाल्याचे विभागाने म्हटले आहे.


नुकत्याच काही वेळापूर्वी जलसंपदा विभागाने राज्यातील सर्व धरणांच्या पाणी साठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे आणि मराठवाडा या विभागांमधील सर्व मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठयांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १ ते १.५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे विभागाने म्हटले आहे. राज्यातील १४० मोठ्या प्रकल्पांमध्ये यंदा २०.२० टक्के इतका पाणी साठा जमा झाला असून गेल्या वर्षी हे प्रमाण १९.४३ टक्के इतके होते, तसेच लघु प्रकल्पांमध्ये देखील तब्बल ४ टक्क्यांनी वाढ झाली असून या आकडेवारीनुसार राज्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याचे विभागाने म्हटले आहे. तसेच या महिन्यामध्ये देखील राज्यात समाधानकारक पाऊस पडेल, असा विश्वास देखील विभागाने व्यक्त केला आहे.
 


@@AUTHORINFO_V1@@