घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |

विनाअनुदानित ५५ तर अनुदानित सिलेंडर २ रुपये ७१ पैशांनी महाग 




मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने अगोदरच हैराण झालेल्या सामान्य नागरिकांसाठी आता आणखी एक चिंतेची बाब समोर आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या पाठोपाठ आता घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये देखील वाढ झाली असून विनाअनुदानित गॅस सिलेंडर हा तब्बल ५५ रुपयांनी महाग झाला आहे. तसेच विनाअनुदानित सिलेंडर हा देखील २ रुपये ७१ पैशांनी महागला आहे. त्यामुळे ऐन जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणर आहे.
दरम्यान आजपासूनच ही नवीन दरवाढ संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नैसर्गिक वायूंचे दर वाढल्यामुळे ही नवीन दरवाढ लागू करण्यात आली असल्याची माहिती इंडियन ऑईल या कंपनीने दिली आहे. या नव्या दरवाढीनुसार १४ किलोग्रॅमच्या अनुदानित गॅस सिलेंडरचे दर हे अनुक्रमे दिल्लीत ४९६ रुपये, कोलकत्तामध्ये ४९९, मुंबईमध्ये ४९४ आणि चेन्नईमध्ये ४८४ रुपये इतके असणार आहे. तसेच विनाअनुदानित सिलेंडरचे दर हे दिल्लीत ७५४ रुपये, कोलकत्तामध्ये ७८१, मुंबईमध्ये ७२८ आणि चेन्नईमध्ये ७७० रुपये इतके असणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@