उत्तराखंड येथे मोठा अपघात, बस दरीत कोसळली ४५ नागरिकांचा मृत्यु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |

 
 
गढवाल (उत्तराखण्ड) :  उत्तराखंडच्या पौढी गढवाल येथे आज मोठा अपघात झाला. एक बस दरीत कोसळल्याने ४५ नागरिकांचा मृत्यु झाला असल्याची घटना घडली आहे. पौड़ी-धूमाकोट नैनीडांडा या मार्गावर हा अपघात झाला. बस भौन येथून रामनगर येथे जात होती.
 
 
 
 
बसमध्ये एकूण २८ लोकांच्या बसण्याची व्यवस्था होती. मात्र यामध्ये एकूण ५० नागरिक प्रवास करत होते. ४५ पैकी २० मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून जखमी झालेल्या एकूण १२ नागरिकांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अचानक हा अपघात का झाला? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
बस १०० मीटर खाली दरीत कोसळली. जखमी नागरिकांच्या मदतीसाठी हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे, तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे तेथील नागरिक चिंताग्रस्त आहेत.
@@AUTHORINFO_V1@@