मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाला धक्का लागू देणार नाही : राज ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |



मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये राहत असलेल्या मराठी माणसाला मुंबईमधून हाकलून देण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. परंतु मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाला मनसे कधीही धक्का लागू देणार नाही', असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतील वांद्रे येथे शासकीय वसाहतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये आज ते बोलत होते.

'मुंबईमध्ये आज मराठी माणसाला आपल्या हक्काच्या घरासाठी वणवण करत भटकावे लागत आहे. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढण्यासाठी अमराठी बांधकाम व्यावसायिक सातत्याने प्रयत्न करत आहेत. याकामात काही मराठी बांधकाम व्यावसायिक देखील त्यांना मदत करत आहेत. परप्रांतातून आलेल्यांना हक्काची घरे दिली जातात, परंतु मराठी माणसाला मात्र हुसकावून लावले जाते. राज्यकर्त्यांसमोर शहरात मोठ्मोठ्याला झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत. परंतु त्यावर कोणीही कसल्याही प्रकारचा उपाय करायला तयार नाही. परंतु कोणी कितीही प्रयत्न केले, तरी मुंबईतील मराठी माणसाच्या पाठीशी मनसे नेहमी खंबीरपणे उभी राहील आणि त्यांना त्यांच्या हक्काची घरे याठिकाणी मिळवून देईल', असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.









याचबरोबर मुंबई-बडोदा एक्स्प्रेस-वे आणि बुलेट ट्रेन या मुद्द्यांवर देखील त्यांनी यावेळी भाष्य केले. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी म्हणूनच हे दोन्ही प्रकल्प मोदी उभारत आहेत. या दोन प्रकल्पांच्या पूर्तीनंतर मुंबईमध्ये येणाऱ्या गुजराती लोकांचा लोंढा आणखी वाढणार असून त्यामुळे मराठी माणसाचे याठिकाणी राहणे आणखी मुश्कील करण्याचा या लोकांचा डाव आहे, त्यामुळे मुंबईतील मराठी माणसांनी या दोन्ही प्रकल्पांना कायम विरोधक करायला हवा, असे देखील ते यावेळी म्हणाले.


@@AUTHORINFO_V1@@