जीएसटीची वर्षपूर्ती, पंतप्रधानांनी राज्यांचे मानले आभार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |



 
 
नवी दिल्ली :  आज जीएसटी करप्रणाली लागू होऊन तब्बल एक वर्ष पूर्ण झाले आहे. या दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे दिल्ली येथे मोठे आयोजन करण्यात आले आहे. या दिनानिमित्त केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्हिडियो कान्फरेंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यादिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आणि राज्यांचे आभार मानत या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्रत्येक राज्याची विचारधारा वेगळी असते, वेगळ्या मतांची लोकं सत्तेवर असतात, मात्र जीएसटी मुळे सर्व राज्यांनी एकत्र येऊन देशातील सगळ्यात मोठी "एक राष्ट्र एक करप्रणाली" लागू केली, यानिमित्त सगळ्यांचे अभिनंदन असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
जीएसटीमुळे विविध व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा : पियूष गोयल

जीएसटीला आज मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या करप्रणालीमुळे देशातील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. आजचे हे यश सगळ्यांच्या एकत्रित येऊन कार्य करण्यामुळे आणि मेहनतीमुळे आहे, असे प्रतिपादन आज केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी आज केले. दिल्ली येथे जीएसटी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज ते बोलत होते. या करप्रणालीमुळे "इज ऑफ डूइंग बिझनेस'मध्ये वाढ झाली आहे. तसेच जीएसटी म्हणजे जी- ग्रोथ (विकास), एस- सिंप्लिसिटी (सोपी पद्धत), टी - ट्रांसपरेंसी (पारदर्शक पद्धत) असा त्यांनी जीएसटीचा अर्थ सांगितला.
जीएसटीमुळे देशात अधिकृत आणि पारदर्शक व्यवहारांमध्ये वाढ :

जीएसटी ही करप्रणाली एक देशाची आर्थिक परिस्थिती बदलणारी करप्रणाली ठरली आहे. जीएसटीमुळे देशात अधिकृत आणि पारदर्शक व्यवहारांमध्ये वाढ तसेच करसंग्रहात वृद्धी झाली आहे. आजच्या या ऐतिहासिक दिनानिमित्त मी राज्यांना आणि ही करप्रणाली यशस्वी करण्यासाठी कार्य करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतो, अशा भावना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज व्यक्त केल्या.
@@AUTHORINFO_V1@@