राजधानी हादरली, एकाच घरात आढळले ११ मृतदेह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्ली एका खळबळजनक घटनेमुळे हादरली आहे. आज सकाळी दिल्ली येथील बुराडी भागात एकाच घरात ११ मृतदेह आढळले आहेत. या भीषण घटनेमुळे परिसरात तणावाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांमध्ये ७ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे.
 
मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक एकाच घरातील सदस्य आहेत. ही सामूहिक आत्महत्या आहे का ? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र अद्याप या घटनेचे कारण सापडलेले नाही. याविषयी पोलिस कसून तपास करत आहेत.
 
 
 
 
प्राथमिक माहितीनुसार हे सर्व सदस्य दूध आणि फर्नीचरच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. घटनास्थळी १० मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले, तर एक मृतदेह जमिनीवर आढळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेहांजवळ कुठलीही चिट्ठी आढळलेली नाही, त्यामुळे ही आत्म हत्या आहे की हत्या याविषयी अद्याप काही सांगता येणार नाही, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
 
पोलिसांना घटनेविषयी माहिती सकाळी ७.३० ला मिळाल्यानंतर पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील माहिती स्पष्ट होईल.
@@AUTHORINFO_V1@@