भाजपा-खाविआत जागा वाटपाचा तिढा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |

कार्यकर्त्यांचा स्वबळाचा आग्रह कायम


 
जळगाव, १ जुलै :
 
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपा आणि खाविआ यांच्यात युतीचे संकेत देण्यात आले असले, तरी जागा वाटपाचा तिढा मात्र, कायम आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षाला सर्वाधिक जागा मिळाव्यात असे वाटत आहे तर जागा वाटपाचे सूत्र बुधवारपर्यंत निश्‍चित होण्याची शक्यता आहे.
 
 
ना. गिरीश महाजन आणि माजीमंत्री सुरेशदादा जैन यांनी युतीचे संकेत दिले असले तरी अद्याप दोन्ही बाजूने जागा वाटपाचे सूत्र ठरलेले नाही. महापालिकेत एकूण ७५ सदस्यसंख्या असून, यापैकी ५२ जागा सत्ताधारी गट खाविआ व मित्रपक्षांकडे आहेत. भाजपकडे स्वतःच्या १५ जागा आहेत. महापालिकेवर भाजपची सत्ता असायला हवी हे कार्यकर्त्यांचे जुने स्वप्न आहे. त्यासाठी ‘मिशन ५० प्लस’ची आखणी करण्यात येऊन त्यानुसार कामही सुरू झाले होते. त्यामुळे युतीचे संकेत मिळूनही भाजपचे कार्यकर्ते अजूनही स्वबळासाठी कमालीचे आग्रही आहेत. नेत्यांनी युती केलीच तर भाजपला किती जागा मिळायल्या हव्यात याविषयी वेगवेगळे मतप्रवाह पक्षात आहेत. पण किमान ५० टक्के यावर एकमत दिसले. भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसायला हवा, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तिकडे खाविआच्या कार्यकर्त्यांनाही नेत्यांनी युती न करता स्वबळावर लढावे, असे वाटते. कार्यकर्त्यांचा एक गट भाजपला २५ पेक्षा अधिक जागा देऊ नयेत या मताचा आहे.
 
 
केवळ भाजप उमेदवारांचा प्रचार करू  - सुभाषतात्या शौचे
भाजप जळगाव महानगरचे उपाध्यक्ष सुभाषतात्या शौचे म्हणाले की, कार्यकर्त्यांचा युतीला प्रचंड विरोध आहे. ही अभद्र युती त्यांना नको आहे. तरीही नेत्यांचा आग्रह असेल तर भाजपला किमान ५० जागा मिळायला हव्यात. त्याशिवाय ‘मिशन ५० प्लस’ पूर्ण होऊ शकत नाही. तसेच पक्षाचे कार्यकर्ते केवळ भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करतील. आमचा व्यक्तीला नव्हे, तर प्रवृत्तीला विरोध असल्याचेही शौचे यांनी सांगितले.
 
 
धनुष्यबाण चिन्हावर लढण्यास तयार - सुरेशदादा
जागा वाटपाचे सूत्र बुधवारपर्यंत ठरेल. त्या दृष्टीने बोलणी सुरू आहेत, अशी माहिती माजीमंत्री सुरेशदादा जैन यांनी दिली. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह ‘धनुष्यबाण’वर मनपा निवडणूक लढविण्यास आपली तयारी आहे. शहरविकासासाठी भाजपची साथ हवी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेतील एकूण जागा - ७५
खाविआचे कार्यकर्ते म्हणतात भाजपला एवढ्याच जागा पुरे - २५
‘मिशन ५० प्लस’साठी भाजप कार्यकर्त्यांच्या पहिल्या गटाला हव्या असलेल्या जागा - ५०
भाजप कार्यकर्त्यांच्या  दुसर्‍या गटाला हव्या असलेल्या जागा - ४०
@@AUTHORINFO_V1@@