सारे काही घरट्यासाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018   
Total Views |


 

 

मैदानात घरट्याचे रक्षण करण्यासाठी एका सुरक्षारक्षकालाही तैनात करण्यात आले आहे. कोणीही घरट्याची नासधूस करू नये, यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.


एका पक्ष्याचे घरटे वाचवण्यासाठी, कॅनडामधला सर्वात मोठा ‘म्युझिक फेस्टिव्हल‘ पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. पक्ष्याचे घरटे वाचवावे की, ३ लाख चाहत्यांची उपस्थिती असणारा कार्यक्रम पुढे ढकलावा, हा सर्वात मोठा पेच आयोजकांपुढे पडला आहे. खरे तर, एका पक्ष्यासाठी कोणता देश किंवा आयोजक स्वत:चे आर्थिक नुकसान का करेल? असा प्रश्न साहजिकच कोणालाही पडेल. अनेक ठिकाणी माणसे स्वत:च्या स्वार्थासाठी कधीही मुक्या जीवांचा विचार करत नाहीत. आपल्या मार्गात अडथळे आणणार्‍या गोष्टीला दूर हटवण्यासाठी माणसे मागेपुढे पाहत नाहीत. स्वत:ची घरे बांधण्यासाठी पक्ष्यांची घरटी, प्राण्यांचे निवासस्थाने बुलडोझरखाली चिरडलेली आपण पाहिली आहेत. अशावेळी, कॅनडासारखा देश एका पक्ष्याचे घरटे वाचवण्यासाठी का प्रयत्न करत आहे? हे वाचून तुम्हालाही नक्कीच त्या देशाचे कौतुक वाटेल.

 

येत्या दि. ५ जुलैला ओटावामध्ये या देशातला सर्वात मोठा ‘म्युझिक फेस्टिव्हल‘ होणार आहे. नावाजलेले गायक या फेस्टिव्हलची शोभा वाढवणार आहेत. जवळपास ३ लाख संगीतप्रेमी या कार्यक्रमासाठी येणार आहेत. मात्र ‘किलडिअर’ पक्ष्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. या कार्यक्रमाची तयारी करताना मैदानात एका किलडिअर पक्ष्याची अंडी काही कर्मचार्‍यांच्या नजरेस पडली. मादी किलडिअर काही वेळाने ही अंडी उबवण्यासाठी तिथे आली. कॅनडाच्या वन्यजीव कायद्याप्रमाणे, या पक्ष्याला विशेष संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या पक्ष्याची शिकार करणे तर, दूरच राहिले पण त्याची अंडी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठीही आयोजकांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. या पक्ष्याचे घरटे काही फूट जरी हलवले, तरी कायमस्वरूपी मादी ते घरटे आणि अंड्यांना सोडून निघून जाते. हा पक्षी अत्यंत दुर्मीळ आहे. त्यामुळे या पक्ष्याची अंडी आणि त्यातून येणारी पिल्ले ही नक्कीच महत्त्वाची आहेत. अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी किमान २४ ते २८ दिवसांचा काळ लागणार आहे. अशा परिस्थितीत फेडरेशन परवानी देण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे मैदानात असलेल्या घरट्यात जोपर्यंत पिल्लांची चिवचिव ऐकू येत नाही, तोपर्यंत आयोजकांना हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागणार आहे.

 

सध्या या  त्याचप्रमाणे मैदानात ज्या ठिकाणी ही अंडी आहेत, त्या परिसराभोवती कडे उभारण्यात आले आहे. या देशात कायद्याने या पक्ष्यांना संरक्षण दिल्याने, त्यांच्या घरट्याला हात लावण्याची परवानगी कोणालाही नाही. आता मात्र घरट्यातील चारपैकी ३ अंड्यांतून पिल्ले बाहेर आल्याने चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. पण अजूनही एका अंड्यातून पिल्लू बाहेर आले नसल्याने, सगळ्यांचे लक्ष तिथे लागून आहे. कारण या पिल्लाच्या जन्मावरच सर्वात मोठ्या म्युझिक शोचे भविष्य ठरणार आहे. जर सरकारने परवानगी दिली असती, तर हे घरटे मुख्य स्टेजपासून ३० मीटरपर्यंत हलवण्यात येणार होते. दर वीस मिनिटांनी घरटे मुख्य जागेपासून काही इंच हलवून ते नवीन जागेपर्यंत न्यायचे, असा बेत होता. जर या घरट्याला मानवाचा स्पर्श झाला किंवा घरट्याची जागा हलवण्यात आल्याचे या पक्ष्याच्या लक्षात आले असते, तर मादीने कायमस्वरूपी ते घरटे आणि अंडी तशीच सोडून दिली असती, म्हणूनच घरटे हलवण्यासाठी परवानगी मिळणे जवळपास अशक्यच होते.

 

मात्र, शनिवारी संध्याकाळी चारपैकी ३ अंड्यातून पिल्ले जन्माला आली आणि आयोजकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आता सर्वांनाच चौथ्या अंड्यातूनही पिल्लू बाहेर येण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

@@AUTHORINFO_V1@@