अन्नजाळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |






 

एकच जीव एका परिसंस्थेत एकापेक्षा अधिक पातळ्यांवर राहू शकतो. एक भक्षक अनेक मार्गांनी भक्ष्य मिळवितो. एक जीव अनेक भक्षकांचे भक्ष्य असतो. म्हणजे एकाच परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्यांतील सजीव एकापेक्षा अनेक पोषण पातळ्यांमध्ये घटक असतात.
 

प्रत्येक परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या असतात. त्या परस्परसंबंधाने जोडल्या जाऊन अन्नजाळी तयार होते. परिसंस्थेमध्ये स्वयंपोषी वनस्पतींनी तयार केलेली अन्नऊर्जा एक किंवा एकापेक्षा अधिक भक्षकांद्वारे ग्रहण केली जाते. अन्नजाळी ही ऊर्जा विनिमयाची प्राथमिक स्तरापासून उच्च स्तरापर्यंतची ऊर्जा संक्रमित होणारी गुंतागुंतीची संरचना असते. एकच जीव एका परिसंस्थेत एकापेक्षा अधिक पातळ्यांवर राहू शकतो. एक भक्षक अनेक मार्गांनी भक्ष्य मिळवितो. एक जीव अनेक भक्षकांचे भक्ष्य असतो. एकाच परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्यांतील सजीव एकापेक्षा अनेक पोषण पातळ्यांमध्ये घटक असतात.

 

अन्नजाळीची सुरुवात उत्पादकापासून म्हणजेच हिरव्या वनस्पतीपासून होते. अन्नजाळीतील विविध अन्नसाखळ्या एकमेकींना जोडलेल्या असतात. अन्नजाळीतील सर्वोच्च पातळीवर मानव आहे; कारण तो सर्वभक्षी आहे. अनेक मार्गांनी तो अन्नजाळींमधून आपले अन्न मिळवितो. विघटक कोणत्याही पातळीवर कार्यरत असतात. वनस्पती व प्राण्यांची मृत शरीरे हा त्यांचा ऊर्जास्रोत असतो.  वेगवगेळ्या प्रकारचे सजीव वेगवेगळ्या ऊर्जा विनिमय स्तरांमध्ये एकमेकांशी संबंधित राहतात. उदा., गवताळ प्रदेशातील कुरण अन्नसाखळीत काही वेळा उंदीरसुद्धा गवत खातात. उंदराचे प्रत्यक्षपणे बहिरी ससाण्याकडून किंवा सापाकडून भक्षण केले जाते. सापांना बहिरी ससाणे खातात. गवताळ परिसंस्थेतील अन्नजाळीत पुढीलप्रमाणे अन्नसाखळ्या गुंफलेल्या आढळतात.

 

अन्नजाळ्याचे एक वेगळे उदाहरण चित्रात दाखवले आहे. अशा वेगवेगळ्या अन्नसाखळ्या वेगवेगळ्या भागांत परस्परांशी निगडित असल्यामुळेच विविध अन्नजाळ्यांची निर्मिती होते. याशिवाय गवताळ परिसंस्थेत गिधाड, कोल्हा व मानव यांसारखे काही द्वितीयक भक्षकही असतात.  अन्नजाळीतील कोणत्याही पोषण पातळीवर उपलब्ध असलेली अन्नऊर्जा परिसंस्थेतील सजीवांना पूर्णपणे उपयोगी पडत नाही. संक्रमणाच्या वेळी प्रत्येक पातळीवर अन्नऊर्जा वापरली जाते. त्यामुळे वरच्या पातळीवर अन्नऊर्जा कमी कमी होत जाते. काही परिसंस्थांमधील आंतरक्रिया अतिशय क्लिष्ट असतात. अशा परिसंस्थांमध्ये प्राथमिक भक्षक हे एका किंवा अनेक प्रकारांच्या द्वितीयक स्तरावरील भक्षकांकडून अन्न म्हणून ग्रहण केले जातात. अन्नसाखळीप्रमाणेच अन्नजाळीची संरचना असते. एक किंवा अनेक द्वितीयक, तृतीयक अथवा उच्चस्तरीय भक्षकांचे अन्न प्राथमिक भक्षक हे असते.

 

निसर्गातील परिसंस्थांचा समतोल राखण्यासाठी अन्नजाळ्या अतिशय महत्त्वाच्या असतात. परिस्थितीकीय संतुलन हे सर्व सजीवांसाठी आवश्यक असते. निसर्गातील प्राथमिक भक्षक नाहीसे झाले, तर उत्पादक त्यांच्यातील गर्दींमुळे व परस्परांमधील स्पर्धेमुळे नाश पावतील. तसेच प्राथमिक भक्षकांचे जीवन द्वितीयक भक्षकांशी निगडित असते. म्हणून कोणत्याही परिसंस्थेतील प्रत्येक प्रजाती, काही अंशी निसर्गात:च प्रमाणित राखली जाते. त्यामुळे परिसंस्था संतुलित राखण्यासाठी मदत होते. कोणत्याही अन्नजाळ्यांतील गुंतागुंतत ही त्या परिसंस्थेतील जैवविविधतेवर अवलंबून असते.

 

अन्नजाळे
 

गवत - नाकतोडा - बहिरी ससाणा

गवत - नाकतोडा - सरडा - बहिरी ससाणा

गवत - ससा - बहिरी ससाणा

गवत - उंदीर - बहिरी ससाणा

गवत - उंदीर - साप- बहिरी ससाणा

@@AUTHORINFO_V1@@