चौथ्या समूहासह अमरनाथ यात्रेला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |

 
 
पहलगाम :  कडक सुरक्षाव्यवस्थेत अखेर अमरनाथ यात्रेचा चौथा समूह देखील अमरनाथ यात्रेसाठी निघाला आहे. यावेळी भारत सरकारने अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी महत्वाची काळजी बाळगली आहे. पहलगाम येथून आता सर्वच भाविक अमरनाथ यात्रेला निघाले आहेत.
 
या यात्रेसाठी निघालेल्या पहिल्या समूहात एकूण १९०४ भाविक सहभागी झाले आहेत. यामध्ये १५५४ पुरुष, ३३० महिला आणि २० लहान मुले सहभागी झाले आहेत. यात्रेत ३६ बस आणि २५ छोटी वाहने सहभागी झाली आहेत.
 
दक्षिण काश्मीर येथे ३८८० मीटर उंचावर स्थित शंकराच्या अमरनाथ मंदिराच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेत सहभागी होतात. आता पर्यंत या यात्रेसाठी एकूम २ लाख नागरिकांनी आपले नाव नोंदविले आहे.
 
यावेळी सुरक्षेचा कठोर बंदोबस्त पाळण्यात आला आहे. यामध्ये सर्व वाहनांवर रेडियो फ्रिक्वेंसी टॅग लावण्यात येणार आहे. यामुळे सर्व वाहने सुरक्षा रक्षकांच्या संपर्कात राहतील. मात्र पूर आणि पावसामुळे या यात्रेविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@