...त्यापेक्षा स्वबळावर मनपा निवडणूक लढविणे योग्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |

ना. गिरीश महाजन यांची रोखठोक भूमिका

 
 
जळगाव, १ जुलै :
आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि खान्देश विकास आघाडीची युती होण्याचे संकेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यातील निर्णयानुसार मिळाले आहेत. असे असले तरी राजकीय गोटातील चर्चेनुसार युती झाल्यास जागा वाटपाच्या निर्णयासंदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला.
 
 
त्यावेळी त्यांनी केवळ ३० जागा मिळाल्यास ते घेऊन करायचे काय? त्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढविणे योग्य राहील, असे मत त्यांनी ‘तरुण भारत’जवळ व्यक्त केले.  महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खान्देश विकास आघाडीशी युती करण्यासंदर्भात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी संपर्क सुरुच ठेवला होता.
 
 
मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर युती करण्यासोबत जागा वाटपाचा फॉम्युला काय असेल याबाबत राजकीय चर्चा रंगल्या आहेत. त्यात भाजपच्या वाट्याला ३० जागा आणि खाविआला ४५ जागा मिळू शकतील, असा मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरु होती.
 
 
यासंदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, सद्यस्थितीला इच्छूकांकडून अर्ज भरण्यासाठी भाजप कार्यालयात गर्दी होत आहे.
 
 
केंद्रासह राज्यात भाजपचे शासन असल्याने भाजपला पोषक वातावरण आहे. जिल्ह्यात विकासकामांचा धडाका ही भाजपची जमेची बाजू राहील. जागा वाटपात कमी जागा मिळाल्यास फायदा तरी काय? असेही मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
राजकीय वर्तुळातील चर्चा आणि अफवांवर विश्वास न ठेवता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, ते महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे भाजप आणि खाविआ अद्याप तरी जागा फॉर्म्युलाचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात युतीच्या संदर्भात काय निर्णय घेतला जाईल, तेव्हा ७५ जागांच्या वाटपाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@