युनिव्हर्सिटी नाल्याची होणार पुनर्रचना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2018
Total Views |
 

 
 
 
मुंबई : कलिना येथील विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळच्या युनिव्हर्सिटी नाल्याची मुंबई महापालिका पुनर्रचना करणार आहे. यासाठी पालिका ९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी येणार आहे. या नाल्याच्या पुनर्रचनेचे काम मेसर्स ऍक्युट डिझाइन्स या कंत्राटदाराला दिले जाणार आहे. त्यासाठी पालिका या कामाचा खर्च म्हणून कंत्राटदाराला ८.९६ कोटी रुपये देणार आहे. कंत्राटदार हे काम २९.५५% कमी दरात करणार असल्याने या कामाच्या दर्जाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांकडून प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
 
युनिव्हर्सिटी नाल्याच्या पुनर्रचनेनंतर सध्या अस्तित्वात असलेला जुना नाला भराव टाकून बुजविण्यात येणार असून त्या जागेचा वापर रस्त्याच्या पुनर्रचनेसाठी करण्यात येणार आहे. कलिना येथील विद्यापिठाच्या प्रवेशद्वाराजवळील कोलेकल्याण गावातील (हयात गेट) सिटीएस क्र.४०९४ जवळील ४५.७५ मीटरचा डीपी रोड व सध्या अस्तित्वात असलेल्या नाल्याची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
 
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांनी याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाला सादर केला आहे. परंतु विद्यापीठाकडून पालिकेला ज्या ठिकाणी नाल्याची पुनर्रचना करायची आहे, त्या जागेचा अद्याप ताबा देण्यात आलेला नसल्याने पालिकेने या कामाला सुरुवात केलेली नाही. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या अभियंत्यांसोबत गेल्यावर्षीच्या ५ जुलै रोजी नाल्याच्या पुनर्रचनेसाठी भूमापन केले होते. तसेच सदर जागेचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्याबाबत पालिकेने विद्यापीठाला कळविले आहे. जेणेकरून सदर ठिकाणी सद्यस्थितीत ६.७ मिटर रुंदीच्या अस्तित्वात असलेला नाला बुजवून तेवढ्याच रुंदीच्या नवीन नाल्याची पुनर्रचना लवकरात लवकर करता येईल. सदर नाल्याची जागा जमिनीच्या पातळीपर्यंत भराव करून रस्ते विभागास रस्त्याच्या पुनर्रचनेकरिता देण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@