पाकिस्तानला नमवून महिला संघाचा अंतिम सामन्यात प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
मलेशिया : क्वालालंपूर येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्ध भारत या महिला संघाच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानला नमवून आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात मजल मारली आहे. या सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानचे ७ गडी राखून पराभव केला. 
 
 
 
 
या सामन्यामध्ये स्मृती मंधाना हिने ३८ चेंडूंमध्ये ४० धावा पूर्ण केल्या तर हरमनप्रित हिने ३४ चेंडूमध्ये ४९ धावा पूर्ण केल्या. भारतीय संघाने एकूण १६९ धावा करत पाकिस्तानच्या महिला संघाला ९५ धावांनी धूळ चालली.
 
 
 
 
भारतीय महिला संघ हा यापूर्वी देखील पाच वेळा आशियाई चषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच क्रिकेटपटू मोहम्मद कैफ, क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि क्रिकेटपटू शिखर धवन यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महिला संघाचे अभिनंदन केले असून त्यांना अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अंतिम सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाची लढत ही बांग्लादेश यांच्या संघाशी होणार आहे. 
 
 
 
 
स्मृती मंधाना आणि हरमनप्रित यांच्या जोडीने शेवटपर्यंत मैदान राखून ठेवत हा खेळ भारताच्या खिशात टाकला. या दोघींच्या जोडीने एकूण ८९ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. शेवटी सात गडी राखून भारताच्या महिला संघाने पाकिस्तानवर विजय मिळवून दाखविला. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@