एस. सी. ओ. समिटसाठी नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2018
Total Views |

 
शांघाई कोर्पोरेशन ऑर्गनायझेशन समिटच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनच्या क्विंगदावो शहरात दाखल झाले आहेत. शांघाई कोर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस रशिद अलीमो यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. त्या दोघांमध्ये प्राथमिक स्वरुपाची एक बैठक देखील झाली.
 
 
२०१७ सालापासून या संस्थेच्या स्थायी सदस्य झाल्यापासून भारताचे यातील योगदान मोठ्याप्रमाणात वाढले आहे, असे प्रतिपादन रशिद अलीमो यांनी केले. २००१ साली स्थापन झालेल्या या समूहात भारत, चीन, रशिया सह उझबेकिस्तान, किर्गीस्तान, कझाकिस्तान, तझाकिस्तान आणि पाकिस्तान असे एकूण ८ राष्ट्र आहेत. यात जगातील एकूण ४२% लोकसंख्या सामील होते, तसेच २२ टक्के भूभाग असलेल्या या राष्ट्रांच्या समूहाचा एकूण २०% एवढा जीडीपी आहे.
 
 
या कार्यक्रमात राजकीय, आर्थिक, सीमा सुरक्षा, आणि सांस्कृतिक विषयांच्या मुद्द्यावर चर्चा होत असते. यामुळे भारताला मध्य आशियातील देशांशी व्यापार वृद्धीसाठी मोठ्याप्रमाणात फायदा होत असतो.
 
 
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सोबत चर्चा होणार आहे. गेल्या ५ आठवड्यातील पंतप्रधान मोदी यांचा हा सलग दुसरा चीन दौरा आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, भारत प्रथमच यात स्थायी सदस्य म्हणून सहभागी होणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@