६ आठवड्यात दुसऱ्यांदा मोदी- जिनपिंग भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2018
Total Views |

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीन येथील क्विंगदावो शहरात एस.सी.ओ. समिटसाठी दाखल झाले आहेत. त्यातील यजमान राष्ट्रप्रमुख अर्थात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय चर्चा झाली. मोदी यांच्या मागील चीन दौऱ्यानंतर ही गेल्या ६ आठवड्यातील दुसरी भेट ठरली आहे.
 
 
एप्रिल महिन्यात वूहान येथे भारत-चीन मैत्री या विषयावर मोदी आणि जिनपिंग यांच्यात अनौपचारिक भेट घडून आली होती. आजच्या भेटी दरम्यान दोन्ही देशांचे आंतरिक संबंध दृढ होण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. डोकालाम मुद्द्याला ज्या प्रकारे चर्चेने सोडवले गेले, त्याप्रकारे दोन्ही देशांतील महत्वाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासंबंधी चर्चा यात झाली आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी ट्वीट देखील केले आहे. ज्यात नमूद केले आहे की, मी एस. सी. ओ. समिटचे यजमान असलेल्या शी जिनपिंग यांना भेटलो. आम्ही द्विपक्षीय भेटीत काही जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली, यामध्ये भारत चीन मैत्री संबंधांवर अधिक भर दिला गेला आहे, असे देखील त्यांनी यात स्पष्ट केले आहे.
 
 
 
एस.सी.ओ. समिटमध्ये राजकीय, आर्थिक, सीमा सुरक्षा, आणि सांस्कृतिक विषयांच्या मुद्द्यांवर मुख्य चर्चा होणार आहे. त्याचबरोबर भारताकडून मध्य आशियायी देशांशी द्विपक्षीय चर्चा देखील घडून येणार आहे. पंतप्रधान मोदी यांची एस.सी.ओ. समिटचे सरचिटणीस रशिद अलीमो यांच्यासोबत देखील चर्चा घडून आली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@