आंबेडकरी तरुणांनी नक्षली चळवळींपासून दूर राहावे : आठवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |

आरोपी निर्दोष असल्यास आपण स्वतः त्यांच्या पाठीशी उभे राहू



नवी दिल्ली : 'आंबेडकरी तरुणांनी नक्षली चळवळी, संघटना आणि व्यक्तींपासून दूर राहावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज केले आहे. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच नक्षलसमर्थकांना केलेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ते आज बोलत होते.

'पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींविषयी पोलिसांना काही सबळ पुरावे हाती लागल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच या पुराव्यांचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे तपास पूर्ण होईलपर्यंत कोणालाही कसल्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच पोलीस तपासामध्ये जर या आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे कसलेही पुरावे आढळून न आल्यास आपण स्वतः यासर्वांच्या सुटकेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. परंतु आंबेडकरी युवकांनी नक्षलवाद्यांशी निगडीत असलेल्या कसल्याही संघटनेच्या अथवा व्यक्तीच्या संपर्कात राहू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

कोरेगाव भीम दंगलीप्रकरणी पुणे पोलिसांकडून पाच नक्षलवादी समर्थकांना अटक केल्यानंतर पुणे पोलिसांना या दंगलीसंबंधी अनेक सबळ पुरावे हाती लागले आहेत. ज्यामध्ये या दंगलीमागे नक्षलवाद्यासह देशातील अनेक बड्या नेत्यांचा आणि राजकीय पक्षाचा हात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सध्या देशातील सामाजिक वातावरण ढवळण्याची भीती व्यक्त होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@