ठाणे जिल्ह्यात मुलींची बाजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |




ठाणे: मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी सुमारे ९० टक्के इतकी आहे. यंदा ही या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ९२ .१२ टक्के मुली तर ८९ .०३ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. डोंबिवलीतील श्रुतिका महाजन व रिद्धी करकरे या दोघींनी १०० टक्के मिळवले आहेत तर अंधत्वावर मात करत सिद्धार्थ सावंत याने ९५ .४० व आर्यन जोशी याने ८७ टक्के गुण संपादन केले आहे.

यात सर्वच ठिकाणी मुलींनी घवघवीत यश संपादन केले आहे. ठाणे जिल्ह्यात यंदा १ लक्ष,७ हजार,७२० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ९७ हजार ४९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. असेच यश कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे. यंदाचा कल्याण-डोंबिवलीचा निकाल सुमारे ९१ टक्के इतका लागला आहे. यात ९३ .०४ टक्के मुली तर ९० .५५ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. याचबरोबर कल्याण ग्रामीणचाही निकाल सुमारे 89 टक्के इतका लागला आहे. यात ९१ .५८ टक्के मुली तर ८८ .४५ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

अंधत्वावर मात करत

मिळविले यश

तसेच डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या आर्यन जोशी व सिद्धार्थ सावंत या दोन्ही अंध मुलांनी अंधत्वावर मात करत घवघवीत यश संपादन केले आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानुसार आर्यनला ८७ टक्के तर सिद्धार्थला सुमारे ९५ .४० टक्के गुण मिळाले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माध्यमिक शालांत परीक्षेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुमारे ३५ विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात सिद्धार्थ सावंतचाही समावेश आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत त्याला लेखनिक पुरवण्याचे काम करण्यात आल्याची माहिती आयईडी समन्वयक मिलिंद अहिरे यांनी दिली. तसेच सिद्धार्थला ’बेस्ट क्रिएटिव्ह चाइल्ड’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे त्याचबरोबर त्याचे नाव ’लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्येही नोंदविण्यात आले आहे. आर्यनने बुद्धिबळात नॅशनल गोल्ड मेडल पटकावले आहे. तसेच जुलै महिन्यात होणार्‍या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील छोट्या गटातून तो बल्गेरियाला जाणार आहे.

राज्यमंत्र्यांच्या कन्येचे यश

डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची कन्या सलोनी रवींद्र चव्हाण हिने ९६ .४५ टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. हाजीमलंग रोडवरील गुरुकुल द डे स्कूल या शाळेची ती विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाबद्दल राज्यमंत्री चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वाडा तालुक्याचा८७ .६७ टक्के निकाल

वाडा, दि. ८ (प्रतिनिधी) ः वाडा तालुक्याचा निकाल ८७ .६७ टक्के लागला आहे. परीक्षेस ३ हजार १७३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ६४९ इतके विद्यार्थी पास झाले.

ह. वि. पाटील विद्यालय, चिंचघर ८१ .९४ टक्के निकाल लागला आहे.आंबिस्ते हायस्कूल ९२ टक्के, आ. ल. चंदावरकर हायस्कूल खानिवली 86.80, ग्रामीण विद्यालय असनस 93.20, कंचाड हायस्कूल ९७ .५९ , शारदा विद्यालय नेहरोली ६६ .६२ , देवघर विद्यालय ९४ . ४३ , पी. जे. हायस्कूल 84. ३५ , स्वामी विवेकानंद विद्यालय 74. 54, सोनाळे इंग्लिश स्कूल 84, गोर्‍हे विद्यामंदिर 93. 52, बा. ल. शिंगडा विद्यालय पोशेरी ९२ , आश्रमशाळा पाली ९४ . २८ , आश्रमशाळा परळी ९३ .७५ , आश्रमशाळा गारगांव 93. 93, गुरुदेव अंभई विद्यालय 96.20 स्वजन गाडी विद्यालय खैरे आंबिवली ९६ .८४ , डाकिवली विद्यालय ८७ .२३ , अस्पी विद्यालय उचाट ६५ .१५ , केळठण हायस्कूल 81.63, आश्रमशाळा नांदणी 94. 54, आश्रमशाळा देवगाव 73.13, आंबिस्ते माध्यमिक आश्रमशाळा 97.56 टक्के निकाल लागला आहे.

कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूलचा निकाल 99.21 टक्के लागला असून या शाळेचा हर्ष आळशी हा विद्यार्थी ९६ .६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ८९ टक्के

नवी मुंबई: मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या १७ माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल ८८ .९९ टक्के लागला असून नमुंमपा माध्यमिक शाळा, नेरूळचा वैष्णव गंगाराम कोंडाळकर हा विद्यार्थी ९४ .६० टक्के संपादन करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सर्वाधिक गुण संपादन करणारा विद्यार्थी ठरला आहे. माध्यमिक शाळा, करावे येथील रिश्वकुमार रवींद्र झा हा विद्यार्थी ९२ .६० टक्के गुण संपादन करून महापालिका शाळांमध्ये द्वितीय तर पूनम पांडुरंग शिंदे ही माध्यमिक शाळा, सेक्टर ७ , कोपरखैरणेची विद्यार्थिनी ९० .८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

अशाचप्रकारे महानगरपालिकेचा इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचा निकाल यावर्षीही १०० टक्के लागलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची संपूर्ण तयारी इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रामार्फत करून घेण्यात आली होती. दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत संपादन केलेले सुयश निश्चितच इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असल्याचे मत इ. टी. सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांनी व्यक्त केले आहे.

अंबरनाथची स्वरांगी ठाकूरदेसाई शाळेतून पहिली

अंबरनाथ : शुक्रवारी जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात येथील रोटरीच्या इनरव्हील शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतून स्वरांगी ठाकूरदेसाई हिने ४९९ गुण मिळवत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. पहिल्या पाचमध्ये मुलीच उत्तीर्ण झाल्या आहेत.

स्वरांगीला व्हायचंय वैज्ञानिक

चौथी आणि सातवीमध्ये स्कॉलरशिप मिळालेल्या स्वरांगीला वैज्ञानिक व्हायचे आहे. अभ्यासाव्यतिरिक्‍त भरतनाट्यम्ची आवड तिला आहे. नियमित अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याचे स्वरांगीने सांगितले.

गुरुकुलचाही निकाल १०० टक्के

मोहनपुरम येथील गुरुकुल ग्रँड युनियन शाळेचा निकालदेखील १०० टक्के लागला आहे. या शाळेतूनही अनुष्का प्रधान हिने ९५ .२० टक्के गुण मिळवले आहेत.

बदलापूरच्या शिवभक्त आदिवासी आश्रमशाळेचे यश

बदलापूर : बदलापूरजवळील लव्हाळी येथील शिवभक्त आदिवासी आश्रमशाळेचा सतत चौथ्या शालांत परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेचे चाळीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जयेश ठोंबरे या विद्यार्थ्याला ७६ टक्के गुण मिळवून तो शाळेत प्रथम आला आहे. प्रवीण पारधी हा विद्यार्थी ७३ टक्के गुण मिळवून तिसरा आला आहे. माधुरी खैर ही 72 टक्के गुण मिळवून तिसरी आली असल्याचे आश्रम शाळेचे सचिव रमेश बुटेरे यांनी सांगितले. महिला मंडळ, कुळगाव संचलित द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयाचा निकाल 97.20 टक्के लागला आहे. एकूण १४३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील १३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

@@AUTHORINFO_V1@@