रस्त्यावरील खड्डा ४८ तासांत बुजणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |

पालिकेची ऑनलाईन सेवा
प्रत्येक वॉर्डमध्ये तक्रारीसाठी व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक

 

 
 
 
मुंबई : मुंबईत जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पडणारे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने २४ वॉर्डसाठी २४ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आदी ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वीत केली असून कुठल्याही विभागात खड्ड्या पडल्याची तक्रार आल्यास ती १ ते ४८ तासांत सोडवली जाणार आहे.
 
 
मुंबईतसह कोकण भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक-प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी भरपावसातही खड्डे बुजवण्याचे काम सुरू असणार आहे. यासाठी लागणारे कोल्डमिक्स पालिकेने स्वत: तयार केले असून पावसाळ्यासाठी लागणारे अडीच हजार टन कोल्डमिक्स तयार करण्याचे उद्दिष्ट्य आहे. आतापर्यंत ४० टन कोल्डमिक्स तयार केले असून प्रति २५ किलोप्रमाणे ७५० बॅग्स कोलमिक्स तयार ठेवले आहे. भरपावसात कोल्डमिक्सपासून बुजवलेले खड्डे १०० टक्के मजबूत असून मुंबईकरांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प संचालक विनोद चिठोरे यांनी दिली.
 
प्रत्येक वॉर्डमध्ये तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, तातडीच्या कामांसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये स्पेशल इंजिनीयर, ‘एमसीजीएम - २४ तास’ कार्यरत, रस्त्याच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक - १८००२२१२९३, प्रत्येक वॉर्डमध्ये फलक लावून जनजागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक
 
 
‘ए’ वॉर्ड : मोबाईल नंबर - ८८७९६५७६९८,
‘बी’ - ८८७९६५७७२४,
‘सी’ - ८८७९६५७७०४,
‘डी’ - ८८७९६५७६९४,
‘ई’ - ८८७९६५७७१२,
‘एफ/एन’ - ८८७९६५७७१७,
‘एफ/एस’ - ८८७९६५७६७८,
‘जी/एन’ - ८८७९६५७६८३,
‘जी/एस’ - ८८७९६५७६९३,
‘एच/ई’ - ८८७९६५७६७१,
‘एच/डब्ल्यू’ - ८८७९६५७६३३,
‘के/ई’ - ८८७९६५७६५१,
‘के/डब्ल्यू’ - ८८७९६५७६४९,
‘पीएस’ - ८८७९६५७६६१,
‘पी/एन’ - ८८७९६५७६५४,
‘आर/एस’ - ८८७९६५७६५६,
‘आर/एन’ - ८८७९६५७६३६,
‘आर/सी’ - ८८७९६५७६३४,
‘एल’ - ८८७९६५७६२२/८८७९६५७६१०,
‘एम/ई’ - ८८७९६५७६१२’,
‘एम/डब्ल्यू’ - ८८७९६५७६०८/८८७९६५७६१४,
‘एन’ - ८८७९६५७६१७/८८७९६५७६१५,
‘एस’ - ८८७९६५७६०३/८८७९६५७६०५,
‘टी’ - ८८७९६५७६०९/८८७९६५७६११.
 
@@AUTHORINFO_V1@@