संपामुळे एसटीची वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |



नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिली. संपाच्या हाकेनंतर सकाळी प्रवासी बसच्या २४ फेर्या झाल्या. या संपामध्ये १५० कर्मचारी सामील झाले आहेत. संपामुळे एसटीची वाहतूक ठप्प झाली असून आज प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

 

हा संप काही एस.टी. कामगार संघटनांतर्फे पुकारण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या कालावधीत, तसेच पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्या त्यातच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे एसटी प्रशासनाची व प्रवाशांंचीही कोंडी झाली आहे. आज सकाळपासून एकही बस लासलगाव स्थानकातून सुटली नाही. नाशिक ग्रामीण भागातून शहरात येण्याचे महत्त्वाचे माध्यम एस. टी. आहे आणि हीच वाहतूक बंद झाल्याने सारे व्यवहार ठप्प झाले आहेत.

 

मागण्यांचा तगादा लावत लासलगाव डेपोत बस उभ्या करत कर्मचारी पूर्णपणे संपात सहभागी झाले आहेत. लासलगाव एसटीच्या आगारात साधारण १५० कर्मचारी आहेत आणि बहुतांश कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. लासलगाव आगारातून १६ हजार किलोमीटर बस साधारणपणे एका दिवसाला चालते. लासलगाव आगाराचे एका दिवसाचे उत्पन्न सुमारे चार ते पाच लाखापर्यंत जमा होते. मात्र आगारातली एसटी वाहतूक ठप्प झाल्याने एसटीचे उत्पन्न बुडणार आहे. प्रशासन आणि जनता यांना कोंडीत पकडणाऱ्या संपाला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@