भेट आणि मन की बात : राज ठाकरे यांचे शाह-ठाकरे भेटीवर व्यंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |

 
 
मुंबई :   काल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली, या भेटीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज एक व्यंगचित्र समाज माध्यमांवरुन पोस्ट करत टीका केली आहे. या व्यंगचित्रात अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकमेकांना मिठी मारत एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसताना दिसत आहेत. तसेच यावर भेट आणि मन की बात असे लिहीले आहे.
 
 
 
 
आगामी निवडणुका एकत्र लढण्याच्या दृष्टीने ही भेट झाली असली तरी दोघांनीही एकमेकांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचे काम केले आहे. असा या व्यंगचित्रातून राज यांना म्हणायचे आहे असे स्पष्ट होत आहे. तसेच त्यांनी याआधी देखील भाजप आणि शिवसेना यांच्या युतीविषयी अनेकदा व्यंगटित्रातून टीका केली आहे.
 
 
 
 
 
याआधी देखील राज ठाकरे यांनी अमित शहा आणि माधुरी दिक्षीत यांच्या भेटीवर असेच एक व्यंगचित्र रेखाटले होते. यामध्ये त्यांनी निवडणुकीआधी कुणाकुणाला भेटायचे त्याची 'बकेट लिस्ट' तयार केली असल्याचे दाखवले आहे. यावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली होती.
@@AUTHORINFO_V1@@