पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून चीन दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |


नवी दिल्ली : शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) वार्षिक बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्यापासून चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी एससीओच्या सदस्य राष्ट्रप्रमुखांची तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ते द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत.

चीनमधील चिंगदाओ या शहरामध्ये उद्यापासून या बैठकीला सुरुवात होणार आहे. यामध्ये भारत, चीन, रशिया आणि पाकिस्तानसह एकूण ८ देश या बैठकीत सहभागी होणार आहेत. हिंदी आणि प्रशांत महासागर परिसरातील सुरक्षा आणि त्याच्या निगडीत प्रश्न हे यंदाच्या बैठकीच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

दरम्यान बैठक झाल्यानंतर शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीनसह उपस्थित नेत्यांशी पंतप्रधान मोदी हे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पाकिस्तान पंतप्रधान शाहीद खाक्न अब्बासी हे देखील या बैठकीत सहभागी होण्यासाठी म्हणून या ठिकाणी येणार आहेत. परंतु त्यांच्याशी पंतप्रधान मोदींची भेट होणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. तसेच सामरिक आणि राजकीय दृष्ट्या ही बैठक भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@