माओवादी हरलेली लढाई लढत आहेत : राजनाथ सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
जम्मू :  "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचणारे माओवादी हरलेली लढाई लढत आहेत. त्यांचे साम्राज्य संपले आहे, संपूर्ण देशातील केवळ १० जिल्ह्यांमध्ये ते सक्रीय आहेत, आणि म्हणूनच असे काही करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था असे होऊ देणार नाही" असे प्रतिपादन आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. जम्मू येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
 
 
 
 
यावेळी त्यांनी जम्मू काश्मीर येथील नागरिकांसाठी असलेली काही महत्वाची माहती दिली.

पश्चिमी पाकिस्तानातील निर्वासितांसाठी निधी :
"आम्ही जम्मू-काश्मीर राज्यातील स्थायिक झालेल्या पश्चिम पाकिस्तानी निर्वासितांसाठी ५.५ लाख रुपये प्रति परिवार आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जवळजवळ ५७६४ कुटुंबांना लाभ होईल." असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
 
काश्मीर आणि जम्मू येथील निर्वासितांना देण्यात येणाऱ्या दिलासा रकमेत ३० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आधी ही रक्कम १० हजार रुपये होती आता ती वाढवून १३ हजार रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
 

जम्मू काश्मीर येथे पहिल्यांदाच महिला बटालियन तैनात :

गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीर येथे दोन महिला बटालिन तैनात करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामधील एक बटालियन जम्मू तर एक बटालियन काश्मीर येथे तैनात करण्यात येणार आहे. यामुळे या भागातील २० हजार महिलांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.




सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या परिवारांना ५ लाख रुपयांचा मदत निधी थेट खात्यात जमा करण्यात येणार :

सीमेवर लढणाऱ्या सर्व जवानांना माझा सलाम आहे, त्यांच्यामुळे आज आपला देश सुरक्षित आहेत. सीमेवर लढत असताना शहीद झालेल्या जवानांच्या परिवारांना शासनातर्फे ५ लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात येतो, हा मदत निधी कायम ठेवून आता तो सरळ खात्यात जमा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@