नाशिकमध्ये दहावीच्या निकालात मुलींची सरशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |



नाशिक : शुक्रवारी दि. ८ जून रोजी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालामध्ये नाशिक येथे मुलींचीच सरशी झाली आहे. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार नाशिक विभागातून ९०.२८ टक्के मुली तर ८५.१५ टक्के मुले उत्तीर्ण झाली. विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला असून विभागातील सुमारे दोन लाख ५४ हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८७ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुपारी १ नंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन निकाल पाहाता आला. यासाठी मंडळाने तीन अधिकृत संकेतस्थळे जाहीर केले होेते. या संकेतस्थळावरून निकालाची प्रत देखील काढता येणार आहे. मोबाइलवरूनदेखील निकाल पाहण्याची सुविधा बीएसएनएलने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHSSC स्पेस सीट नंबर टाइप करून ५७७६६ या क्रमांकावर पाठवायचे आहे.

 

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थी अधिकृत गुणपत्रकाची वाट न पाहता गुणपडताळणी व छायांकित प्रतींसाठी अर्ज करू शकणार आहेत. यासाठी आवश्यक तो अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. अधिक माहिती हवी असल्यास विद्यार्थ्यांनी नाशिक विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. पुनर्मूल्यांकनासाठी मात्र विद्यार्थ्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविणे अपेक्षित आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच दिवसांत विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात.

 

उत्तीर्ण श्रेणी

 

जिल्ह्यातील ९० हजार २८३ विद्यार्थ्यांपैकी ८९ हजार ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ८५.९६ टक्के मुले तर ९१.४३ मुलींचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे २३ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली असून ३३ हजार ४७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. २० हजार ४१६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २० विद्यार्थ्यांना ७७३ उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@