शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी घाई करू नये : कृषी विभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |


मुंबई :
मान्सूनच्या आगमनानंतर झालेल्या पहिल्या पावसानंतर काही काळ पावसामध्ये खंड पडण्याची शक्यात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यामध्ये कसल्याही प्रकारची घाई करू नये, असे सल्ला राज्याच्या कृषी विभागने दिला आहे. मान्सूनसंबंधी हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना हा सल्ला दिला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज चुकवत मान्सून राज्यात प्रवेश करण्याचा आपला ७ मुहूर्त अखेर चुकवला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने मान्सूनचे ७ तारखेला राज्यात आगमन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार मान्सूनचे गोव्याच्या सीमेवर देखील आगमन झाले होते. परंतु गोव्याजवळ मडगाव येथे पोहोचल्यावर मान्सूनचा वेग थोडा मंदावला, त्यामुळे राज्यात मान्सूनच्या आगमनाला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच १२ जूननंतर पावसामध्ये पुन्हा एकदा खंड पडण्याची शक्यता देखील हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. हवामान खात्याच्या या माहितीनंतर कृषी विभाने सूचना जाहीर करत, राज्यात योग्य प्रमाणात पाऊस पडेपर्यंत पेरण्या करू नयेत, असा सल्ला दिला आहे.

दरम्यान राज्य सरकारकडून देखील या अगोदरच अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी हवामान खात्याने मान्सूनच्या आगमनाची आणि समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आगमनाच्या काही दिवस अगोदरच पेरण्या करून ठेवल्या होत्या, परंतु हवामान खात्याच्या अंदाज पूर्णपणे खोटा ठरवत मान्सूनने तब्बल महिनाभर दडी मारली होती. यामुळे पेरणी केलेल्या बिया जमिनीमध्येच जळून गेल्या व त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी अगोदरच सावध राहण्याचा सल्ला सरकारने आणि कृषी विभागाने दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@