कोरेगाव-भीमा दंगल : राहुल फटांगळेच्या मारेकऱ्यांचे छायाचित्र जारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |




पुणे : कोरेगाव-भीमा दंगलीमध्ये मारल्या गेलेल्या राहुल फटांगळे या तरुणाच्या मारेकऱ्यांचे छायाचित्र आज पुणे गुन्हे अन्वेषण संस्थेकडून (सीआयडी) प्रसिद्ध करण्यात आले आहेत. दरम्यान या मारेकऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नसून नागरिकांना याविषयी कसल्याही प्रकारची माहिती असल्यास त्यांनी ती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पुणे सीआयडीकडून करण्यात आले आहे.

सीआयडीने यासंबंधी आज एक पत्रकार परिषद घेऊन या आरोपींचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहेत. या हत्येची एक व्हिडिओ क्लिप देखील सीआयडीने प्रसिद्ध केली आली आहे. यामध्ये हे सर्व आरोपी फटांगळेला काठ्यांनी आणि दगडांनी मारहाण करत असल्याचे दिसत आहे. राहुल फटांगळेच्या गळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असल्याच्या कारणावरून त्याला मारहाण करण्यात आल्याचे सीआयडीने म्हटले आहे. तसेच या आरोपींविषयी नागरिकांना कसल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.



कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलमध्ये राहुल फटांगळे या ३० वर्षीय तरुणाचा गेल्या गेल्या जानेवारी महिन्यामध्ये मृत्यू झाला होता. यावेळी फटांगळेच्या मृत्युवरून अनेकांनी मोठा गदारोळ उठवला होता. तसेच या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान या दंगलीप्रकरणी पुणे पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईनंतर या दंगलीविषयी अनेक गोष्टी आणि पुरावे समोर येऊ लागले आहेतया दंगलीमागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचे या अगोदरच समोर आलेले आहे.
@@AUTHORINFO_V1@@