हरियाणा सरकारच्या नवीन निर्णयावर बबीता फोगाट नाराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |

 
 
 
हरियाणा :  भारतीय खेळाडूंनी आजवर अनेक समस्यांवर भाष्य केले आहे. याच प्रमाणे भारताची प्रमुख कुश्तीपटू बबीता फोगाट यांनी देखील हरियाणा सरकारच्या नवीन निर्णयावर भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. हरियाणा सरकारच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील खेळाडूंनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठल्याही कंपनीच्या जाहीरातीत काम केले किंवा व्यावसायिक क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला तर त्यांना मिळणाऱ्या मानधनापैकी ३३ टक्के त्यांना सरकारला द्यावा लागेल. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत बबीता फोगाट म्हणाली की, " या निर्णयामुळे मला खूप वाईट वाटले, यामुळे असे वाटते की अशिक्षित लोक धोरणे ठरवतात." 
 
 
 
 
"या लोकांना हे माहीत असायला हवे की आम्हाला मिळणाऱ्या मानधनावर आम्ही आधीच कर भरत आहोत, त्यावरुन जर आम्ही ३३ टक्के रक्कम सरकारला दिली तर हा आमच्या सारख्या खेळाडूंसोबत अन्याय आहे." असेही ती यावेळी म्हणाली. तसेच "यामुळे भारताला मिळणाऱ्या पदकांमध्ये नजीकच्या भविष्यात कमी होईल." अशा भावना देखील तिने यावेळी व्यक्त केल्या. या सरकारला साध्य काय करायचे आहे, असा प्रश्न देखील तिने उपस्थित केला आहे. 
हरियाणा सरकारच्या या निर्णयामुळे हरियाणा येथील खेळाडूंमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हरियाणा राज्याने नेहमीच भारताला खूप चांगले खेळाडू दिले आहेत, तसेच हरियाणा येीथील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात भारताला पदके मिळवून दिली आहेत. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे खेळाडू नाराज आहेत, तसेच हा निर्णय कायम राहिल्यास याचा परिणाम देशाला मिळणाऱ्या पदकांवर होईल असे दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@