पंजाबमधील ऊसशेतकऱ्यांसाठी ८०० कोटींचे पॅकेज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |
 
 
 
पंजाबमधील ऊस शेतकऱ्यांसाठी ८०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून यासंबंधीची माहिती भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया केंद्राच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तसेच यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही यावेळी व्यक्त केले आहेत.
 
आज शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केवळ शीख समुदायच नव्हे तर प्रत्येक धार्मिक आणि धर्मादाय समाजातील, लंगर आणि इतर तत्सम समुदायांना मोफत अन्न सेवांवरील केंद्रीय कर रद्द केल्याबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन अहवाल लागू करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली तसेच पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याचेही आवाहनही केले., अशी माहिती हरसिमरत कौर बादल यांनी दिली आहे.
 
 
 
 
तसेच या बैठकीदरम्यान, श्री गुरु नानक देव यांचा राष्ट्रीय उत्सव म्हणून ५५० वा जयंती कार्यक्रम साजरा करण्याबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच धार्मिक दृष्टिकोनातून विचार करून करारपूर साहिबला भेट देण्यासाठीची विनंतीही यावेळी पंतप्रधानांना करण्यात आली. तसेच ज्या कैद्यांची मुदत पूर्ण झाली आहे, अशा कैद्याची तुरुंगातून सुटका करण्यात यावी, अशी विनंतीही मोदींना करण्यात आली.
 
शिरोमणी आकाली दलाचे अध्यक्ष सूखबीर सिंग बादल यांनी लंगर आणि अन्य अन्न सेवांवरील केंद्रीय कर रद्द केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार व्यक्त करत एकाच वेळी तुमच्यातील धाडसी आणि संवेदनशील नेतृत्व आम्हाला बघण्यास मिळाले. अन्नसेवा करुन मानवतेची सेवा करणाऱ्यांचा आत्मीयतेच्या भावनेने तुम्ही विचार केलात. तुमचा हा निर्णय भावनाप्रधान संकेत म्हणून इतिहासाच्या पानांवर लिहिला जाईल, असे मत व्यक्त केले.
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@