दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |

यंदाही मुलींचीच बाजी, विभागांमध्ये कोकण आघाडीवर



पुणे : महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले असून ८९.४१ टक्के इतका राज्याचा निकाला लागला आहे, अशी माहिती बोर्डच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे. दहावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. तसेच आज दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार असून बोर्डच्या संकेतस्थळावर विद्यार्थांना हा निकाल पाहता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा राज्यातील १७ लाख ४१ विद्यार्थांनी १० वीची परीक्षा दिली होती. यामध्ये मुलींचा निकाल हा सर्वाधिक लागला आहे. एकूण ९१.९७ टक्के मुली या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण मुलांचे प्रमाण हे ८७.२७ टक्के इतके असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विभागवार निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून तब्बल ९६ टक्के इतका निकाल कोकण विभागाचा लागला आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर ९३.८८ टक्के आणि पुणे ९२.०८ टक्के इतका निकाल लागला आहे. यामध्ये नागपूर विभागाचा निकाल हा सर्वात कमी लागला असून ८५.९७ टक्के इतका निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

कसा पाहाल निकाल  :-

* महाराष्ट्र बोर्डने जाहीर केलेल्या http://www.mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर जा.

* याठिकाणी देण्यात आलेल्या SSC Examination Result March 2018 वर क्लिक करा.

* आपला आसान क्रमांक आणि आईचे नाव सर्च बॉक्समध्ये टाका व यानंतर view result वर क्लिक करा.

याच बरोबर SMS द्वारे देखील निकाल पाहता येणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये MHSSC टाईपकडून ५७७६६ या क्रमांकावर पाठवा.

@@AUTHORINFO_V1@@