गृहमंत्री राजनाथसिंग आजपासून काश्मीर दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे आजपासून दोन दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये सिंग हे अमरनाथ यात्रेची तयारी तसेच राज्यातील सुरक्षा स्थितीचा आढावा घेणार आहेत. याचबरोबर सीमावर्ती भागातील काही जिल्ह्यांचा देखील ते दौरा करणार आहेत.  तसेच राज्यात भारत सरकारकडून लागू करण्यात आलेली एकतर्फी शस्त्रबंदी आणि पाकिस्तानकडून होणारा गोळीबार यावर देखील काही ठोस निर्णय घेण्याची देखील शक्यता आहे.

आज दुपारी सिंग हे नवी दिल्लीहून श्रीनगरसाठी रवाना होणार आहेत. श्रीनगर येथे पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम ते राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेणार आहेत. मुफ्ती यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर राज्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सेनाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. सीमेवर होणाऱ्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर देखील काही विषयांवर ते चर्चा करणार आहेत. तसेच सैनिकांबरोबर कुपवाडा, श्रीनगर आणि जम्मूतील काही भागांचा देखील ते दौरा करणार आहेत.

यानंतर दुसऱ्या दिवशी अमरनाथ सिरीन बोर्डच्या काही सदस्यांची बैठक घेऊन अमरनाथ यात्रेसंबंधी त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. यात्रेकरूंची व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबींचा ते आढावा घेणार आहेत. यानंतर काश्मीरमधील युवकांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही उपक्रमांचे उद्घाटन सिंग यांच्या हस्ते करण्यात येणार असून याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व युवकांना देखील ते मार्गदर्शन करणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@