ढवळेसह सर्व आरोपींना आज पुणे न्यायालयात सादर करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |


पुणे : कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी सुधीर ढवळेसह अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना आज पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर न्यायालयासमोर चोख बंदोबस्त करण्याचे आदेश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज दुपारी पुणे पोलिसांकडून एक पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली असून या परिषदेमध्ये या आरोपींच्या अटकेविषयी पोलिसांकडून माहिती देण्यात येणार आहे.

कोरगाव-भीमा दंगल प्रकरणी पुणे पोलिसांनी काल 'विद्रोही' मासिकाच्या संपादक सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन आणि रोना विल्सन यांना अटक केली आहे. कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमागे नक्षलवाद्यांचा हात असून हे सर्व नक्षलवादी हे अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अगोदर पोलिसांनी कबीर कला मंच आणि इतर ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये याविषयी ठोस पुरावे देखील हाती लागल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@