आयकर विभागाने नागरिकांना सहकार्य करावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |


 

 
 
 
मुख्य आयकर आयुक्त झा यांचे आवाहन


ठाणे : आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त विनोदानंद झा यांनी आपल्या एका कार्यक्रमाद्वारे उपस्थित आयकरदाते तसेच उपस्थित संघटना TMA, Federation & Indian industries, Tax Practitioners, Associations ACAI ठाणे विभाग व ज्वेलर्स असोसिएशन आणि इतर मान्यवरांना आयकर भरण्याविषयी माहिती पुरवली. अशा प्रकारे आयकरबद्दल जागृतता निर्माण करण्यचे हे पहिले पाऊल असल्याने त्यांनी सांगितले.

जमलेल्या समुदायाशी संवाद साधताना झा यांनी जमा होणारा वैयक्तिक कर तसेच कंपन्यांकडून जमा होणारा कर यांमध्ये वृद्धी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी उपस्थित समुदायास E-filling बदल माहिती देताना म्हणाले की “फ़क्त कर वसूल करणे हे आयकर विभागाचे कार्य नसून कर भरणार्‍या नागरिकांना त्यांचा परतावा योग्य ते सहकार्य करणे आवश्य आहे.”

या प्रसंगी TMA-FII चे अध्यक्ष भालचंद्र रावराणे यांनी आयकर बिभागाने राष्ट्रनिर्माणासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल विभागाचे कौतुक केले. तसेच पुढील कार्यात आयकर विभागाला TMA-FII चे पूर्ण सहकार्य असेल असे आश्वासन दिले.

ठाण्याचे मुख्य आयकर आयुक्त नित्यानंद मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानून आयकर विभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

@@AUTHORINFO_V1@@