ए.पी.जे अब्दुल यांच्यानंतर आता पुन्हा राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होणार नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली :  माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी तसेच अन्य कुठलेही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाही. राष्ट्रपती भवन ही एक सार्वजनिक इमारत आहे, त्यामुळे येथे कुठल्याही धर्मासंबंधी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाही, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरच हा निर्णय घेतला होता. अशी माहिती राष्ट्रपती भवनाचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
 
 
 
धर्म आणि शासन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रपती भवन हे देशातील करदात्या जनतेचे आहे, त्यामुळे शासनाच्या निधीवर राष्ट्रपती भवन येथे कुठलाही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती यांचा कोणत्याही धर्माला विरोध नाही, ते प्रत्येका धर्माचा आदरच करतात, मात्र राष्ट्रपती भवन ही शासकीय वास्तु असल्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती प्रत्येका सणाच्यानिमित्ताने देशवासियांना शुभेच्छा देतीलच, तसेच राष्ट्रपती भवन येथे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात येणार नाहीत. त्यांना त्यांच्या धर्मानुसार सण साजरे करण्यापासून कुणीच थांबवणार नाही, असेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
या आधी २००२ ते २००७ या काळात माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी इफ्तार पार्टी राष्ट्रपती भवनावर साजरी केली नव्हती, तसेच यासाठी गोळा करण्यात आलेला निधी त्यांनी गरीबांमध्ये वितरित केला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या काळात देखील कुठलेही धार्मिक कार्यक्रम राष्ट्रपती भवनावर साजरा करण्यात आला नाही.
@@AUTHORINFO_V1@@