शासकीय दाखले वितरणात नाशिक ठरले ‘अव्वल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |

 

नाशिक : विविध कारणास्तव लागणारे शासकीय दाखल्यांचे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे वितरण करण्यात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय अव्वल ठरले आहे. महिन्याभरात विविध प्रकारचे तब्बल ५९ हजार ९७० दाखले कार्यालयाकहून वितरित करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्याने दाखले वितरणात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, तो कायम ठेवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला आगामी काळात पेलावे लागणार आहे.
 

नाशिक जिल्ह्याधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन दाखले देण्यात आले. त्यात उत्पन्नाचे ३१ हजार ९२९, जातीचे दाखले नऊ हजार ९१३, वय व अधिवास प्रमाणपत्र आठ हजार ९९६, नॉन क्रिमीलेयर सहा हजार ५३८, प्रतिज्ञापत्र ११४४, रहिवास दाखले १७६, महिला आरक्षण ८१ व इतर.दाखले वितरणात अहमदनगर दुसऱ्या क्रमांकावर असून, पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची गरज असते. दाखल्यांअभावी विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाने ’आपले सरकार सेवा केंद्रा’द्वारे ऑनलाईन दाखले वितरित करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तब्बल ८३ केंद्रही सुरू करण्यात आली आहेत. शिवाय महाविद्यालयांमध्येही लवकरच ’आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात नाशिक जिल्ह्याने दाखले वितरणामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

 

असे झाले दाखल्यांचे वितरण (कालावधी- 1 ते 31 मे 2018)

 

नाशिक - ५९ हजार ९७०

अहमदनगर - ५१ हजार ५९६

पुणे - ४२ हजार ५७९

यवतमाळ - ४० हजार ८४०

सोलापूर - ३४ हजार ३१९
@@AUTHORINFO_V1@@