जीवन व आरोग्य विमा पॉलिसी उतरविताना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |

 
 
 
नोकरदार मुलांनी जीवन विम्याचे संरक्षण हयावयास हवे टर्म इन्शुरन्स घेणे चांगले किती रक्‍कमेचा विमा घ्यावाः

जगात हदयविकाराने मृत्यू येणारयांचे प्रमाण भारतात जास्त आहे. जगातल्या १३ कर्करोग रुग्णांपैकी एक कर्करोग रुग्ण भारतीय असतो. भारतातील कर्करोग रुग्णाचे जागतिक पातळीवरील प्रमाण तेरास एक असे आहे. या पार्श्‍वभूमीवर तुमच्याकडे योग्य मुल्याची जीवन व आरोग्य विमा पॉलिसी हवीच आरोग्य विमा पॉलिसी तुमच्या हॉस्पिटलचा खर्च देते तर जीवन विमा पॉलिसी तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देते. त्यामुळे दोन्ही विम्यांचे संरक्षण हवे.

जीवन विमा कोणासाठी व कधी लहानमुले, विशीच्या आपले तरुण अर्थार्जन नसलेले बेकार व ज्येष्ठ नागरिक यांचा जीवन विमा उतरविला नसला तर ते एकवेळ चालु शकते कारण यांच्यावर कोणाची आर्थिक जबाबदारी नसते नोकरदारांनी जीवन विमा घ्यावयासच हवा कारण त्यांच्यावर त्यांची लहान मुले आर्थिक दृष्टया अवलंबून असतात पूर्वी सर्वच आई वडिल नोकरदार मुलांवर अवलंबून असतात. पण आता हे चित्र बरेच बदलेले आहे पण अजूनही जे आई-वडिल नोकरदार मुलांवर अवलंबून आहेत अशाजेवढ वय कमी तेवढे विम्याचे जास्त रक्‍कमेचे सरंक्षण घ्यावे कारण विम्याचा प्रिमियम हा विमा उतरवितानाच्या वयानूसार ठरतो व जर कमी वय असताना विमा उतरविला तर प्रिमियमची रक्‍कम कमी भरावी लागते सुरुवातीचीच विम्याची प्रिमियमची रक्‍कम विमा पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत कायम राहते प्रत्येकाने वार्षिक उत्पन्नाच्या किमान दहा पट विमा उतरवावा म्हणजे समजा एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये असेल तर त्याने किमान ६० लाखांचा विमा उतरवावा सुरक्षितना म्हणून बरेच लोक वार्षिक उत्पन्नाच्या १० ते २५ पट इतक्या रकमेचे विमा संरक्षण घेतात. एखद्याला एवढया रकमेच्या विमा का उतरवावा असा प्रश्‍न मनात येईल पण चलनवाढीचा वेग विचारात घेता ती रक्‍कम आज मोठी वाटली तरी त्यावेळी ती मोठी वाटणार नाही. ५० ते ६० या दशकात १०० रुपयांची नोट ही मोठी रक्‍कम समजली जायची आज १०० रूपयक आर्थिक व्यवहारांत खिजगणतीचत धरणे जात नाहीत पगारदारांना विमा कंपन्या त्यांच्या पगाराच्या वीस पट विमा सरंक्षण द्यायला तयार असतात याचा फायदा

नक्की हवा एकदाच योग्य रकमेचा जीवन वीमा उतरविल्यानंतर परत परत विमा उतरवायला नको विमा पॉलिसीवर कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता असल्यास ---प्लान विमा संरक्षण घ्यावे टर्म इन्सुरन्स प्लानमध्ये फक्‍त ऑनलाईन किंवा ऑफ लाईन दोन्ही पध्दतीने खरेदी करता येतात ३५ वर्षाच्या इसमाने २५ वर्षांसाठी १ कोटी रूपयांचे विमा सरंक्षण घेतले व याचे वार्षीक उत्पन्न ६ लाख रूपये आहे असे आपण समजू तर या पॉलिसीसाठी ९ ते ११ हजार रूपये इतक्या प्रिमियम भरावा लागेल आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अन्वये विमा पॉलिसीसाठी कोणत्याही आर्थिक वर्षी भरलेला दिड लाख रूपयांपर्यंताचा प्रिमीयर आयकर सवलतीस पात्र आहे.

आरोग्य विमा

प्रत्येकाला आरोग्य विमा किंवा मेडिक्‍लेमची आवश्यकता आहे कारण वैद्यकिय उपचाराचा खर्च प्रचंड असतो तरूणांना कोणताही रोग असण्याची शक्यता कमी असते पण अपघात होवून शकतो भारतात रस्त्यावरील अपघांतांचे प्रमाण प्रंचड आहे. तरूणांना जंतूसंसर्गाचे आजार होवू शकतत त्यामुळे आरोग्य विभा हा जास्त वय असणार्‍यांनीच उतरवावा ही विचारसरणी पूर्णतः चुकीची आहे. हाड सरकणे हाड मोडणे हे सर्व वयोगटातील लोकांच्या बाबातीत घडू शकते महानगरांत या शस्त्रक्रियांसाठी चार लाख रूपर्यांपर्यत ही बिल होवू शकते अशा वेळी जर जीवन विमा नसेल तर केवढी आर्थिक तारांबळ उडू शकेल कोणता प्लान घ्यावा अविवाहीत व नोकरी करण्यामागे वैयक्‍तित पॉलिसी घ्यावी लग्नानंतर फ्लाटर पॉलिसी घ्यावी. फ्लोटर पॉलिसी मध्ये पॉलिसीच्या रकमेपर्यंतच सरंक्षण दोघांपैकी कोणालाही मिळू शकते समजा पती पत्नीची २० लाख रूपयांची फ्लोटर पॉलिसी आहे व पॉलिसी वर्षांत पत्नीच्या आजारणात १५ लाख रूपयांचा दावा संमत झाला तर उरलेल्या ५ लाख रूपयांसाठी पतीच्या उपचारासाठी दाचा करू शकते किंवा विम्याच्या रकमेचा पूर्ण दावा दोघांपैकी कोणीही एक करू शकतो कुटुंबाचा वयोगट जवळजवळच्या असेल तर फ्लोटर पॉलिसीचे घेणे उत्तम पण पती पत्नीच्या वयात फार अंतर असेल तर विमा सल्लागार फ्लोटर पॉलिसीची शिफारस करीत नाहीत.लहान मुले फ्लोटर पॉलिसीत समाविष्ट करावीत पण पालकांना जर काही मधुमेह,ह्रद्यदरोग वगैरे सारखा आजार असेल तर त्यांना फ्लोटर पॉलिसीत समाविस्ट न करता त्यांची स्वतंत्र पॉलिसी काढावी.

किती रकमेचा विमा उतरावावा? आरोग्यर विमापॉलिसी असणे महत्वाचे असले तरी ती किती रकमेची असावी हा मुद्दाही महत्वाचा आहे.आजारपणात तुम्ही कुठल्या प्रकारचे हॉस्पिटल निवडणार हा मुद्दा महत्वाचा आहे.ह्रद्याचा झटका आला तर महानगरांतील सुपर चिशियालीटी हॉस्पिटलात दहा लाख रुपयांचे बिल भरावे लागते तर सरकारी किंवा महापालिकेच्या हॉस्पिटलात बराच कमी खर्च येवू शकतो.दर तीन ते पाच वर्षांनी आरोग्य विम्याच्या संरक्षणाचीरक्कम वाढवावी.ही सुविधाजास्त वयांच्या लोकांसाठी उपलब्ध नाही. टॉप-अप प्लान खरेदी करावा.असाध्य रोगांसाठीही एकवेगळी पॉलिसी आहे यात पॉलिसी धारकाला असाध्य रोग झाला तर त्याला दावा करता येवू शकतो. आरोग्य विमा पॉलिसी हॉस्पिटलचा सर्व खर्च देत नाही.पॉलिसी धारकाला स्वत;च्या खिशातूनही काही रक्कम भरावी लागते. यात दावा दोन प्रकारे करता येतो पहिला प्रकार हॉस्पिटलचे बिल पूर्ण भरुन रुग्णाने घरी यायचे व नंतर दावा करायचा दुसरा पर्याय ‘कॅशलेस’ यात हॉस्पिटलात दाखल होताना किंवा उपचारा दरम्यान पॉलिसी धारकाला पैसे द्यावे लागत नाहीत पण विमा कंपनीने ‘कॅशलेस’ साठी मंजुर केलेल्या रकमेपेक्षा जर हॉस्पिटलचे बिल जास्त झाले तर पॉलिसीधारकाला उर्वरित रक्कम स्वत:ला भरावी लागते.पॉलिसी घेताना एखादा आजार असेल तर तो एक्सक्‍लुजन (एुलर्श्रीीळेप) मध्ये टाकला जातो व या आजारा संबंधी दावे संमत केले जात नाहीत पण काही विमाकंपन्या अगोदर आजार असलेल्यांना तो आजार ‘एक्सक्‍लुजन’ मध्ये न टाकता प्रिमियमची अधिक रक्कम घेवून त्यास संरक्षण देतात.किमान ५ ते१० लाख रुपयांचा आरोग्य विमा असावाच.आरोग्य विमा ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे खरेदी करता येतो. ५ लाखाची वैयक्तिक आरोग्य विमापॉलिसी काढली तर ५ ते ७ हजाररुपयांपर्यंत प्रिमियम भरावालागू शकतो.चौघांच्य ाकुटूंबासाठी दहालाख रुपयांचा फ्लोटर विमा उतरविल्यास १५ ते २० हजार रुपये प्रिमियम भरावा लागू शकतो. आरोग्य विमा पॉलिसीचे आठवणीने मुदती पूर्वी दरवर्षी नूतनीकरण करावे.जर केली नाही तर ती पॉलिसी संपते व नवीन पॉलिसी काढावी लागते परिणामी जुन्या पॉलिसीतले सर्व फायदे रद्द होतात.याचा प्रिमियम चेक ने भरल्यास आयकर सवलत मिळते.आयकर कायदा 1961 च्याकलम ८० डी अन्वये २५ हजार रुपयांपर्यंतचा भरलेला प्रिमियम आयकर कर सवलतीस पात्र ठरतो तर वरिष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही मर्यादा ५० हजार रुपये आहे.

शशांक गुळगुळे

9920895210

@@AUTHORINFO_V1@@