निरोगी भारत हेच आमचे ध्येय - पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |
 
 
 
प्रत्येक भारतीयला स्वस्त आरोग्य सेवा देण्याचा आमचा कायमच प्रयत्न आहे, त्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना लागू करण्यात आल्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो अॅपच्या माध्यमातून प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेच्या आणि देशभरातील केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरोग्य आणि निरोगीपणाचे महत्त्व समजावून सांगितले.
 
आरोग्य हे सर्व यश आणि समृद्धीचा आधार आहे. तसेच जेव्हा देशभरातील १२५ कोटी नागरिक निरोगी असतील तेव्हाच भारत निरोगी होईल. आजारपणामुळे फक्त गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबावर आर्थिक ताण येत नाही तर त्यामुळे आपल्या सामाजिक आर्थिक क्षेत्रांवरही परिणाम होत असतो. म्हणूनच प्रत्येक नागरिकाला स्वस्त आरोग्यसेवा मिळवून देण्याचा सरकार प्रयत्न आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना अल्पदरात आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी व्हावा हाच या योजनांमागील उद्देश आहे, असे मोदींनी यावेळी सांगितले.
 
 
 
 
सरकारकडून देशभरात सुमारे ३६०० पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रे उघडली आहेत, जेथे ७०० पेक्षा जास्त जेनेरिक औषधे अल्पदरात उपलब्ध होणार आहेत. या जनऔषधी केंद्रांवर औषधांची किंमत ही बाजारभावापेक्षा ५० ते ९० टक्क्यांपर्यंत कमी असणार आहे. तसेच येत्या काळात या जनऔषधी केंद्रांची संख्या ५ हजारपर्यंत करण्यात येईल.
 
आरोग्यविषयक उपकरणांविषयी सांगताना मोदी म्हणाले की. आधी नागरिकांना आरोग्यविषयक उपकरणे खरेदी करण्यासाठी स्वतःकडे असलेल्या मालमत्तेची विक्री किंवा गहाण ठेवावे लागत असे पण आता गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी या उपकरणांच्या किंमतीही कमी करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारने गुडघे प्रत्यारोपणाच्या किंमतीही ६० ते ७० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. याबरोबरच प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसीस उपक्रमाद्वारे सरकारने ५०० पेक्षा जास्त जिल्ह्यातील २.२५ लाख रुग्णांसाठी २२ लाख डायलिसीस शिबिरे घेतली आहेत. मिशन इंद्रधनुषच्या अंतर्गत ३.१८ कोटीहून अधिक मुले, ८० लाख गर्भवती महिलांना ५२८ जिल्ह्यांमध्ये लसीकरण करण्यात आले आहे. रुग्णांसाठी अधिक डॉक्टर आणि खाटा वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने ९२ वैद्यकीय महाविद्यालये सुरु केली असून त्यासाठी एमबीबीएसच्या जागाही १५ हजार पर्यंत वाढवल्या आहेत.
 
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आरोग्यसेवा अल्पदरात उपलब्ध होण्यासाठी सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे. याअंतर्गत १० कोटी कुटुंबाना आरोग्य विमाचा लाभ घेता येईल. तसेच स्वच्छ भारत अभियानाविषयी ते म्हणाले की, निरोगी भारत तयार करण्यासाठी या अभियाची खूप महत्वाची भूमिका आहे, या अभियानामुळे भरतात ३.५ लाख गावे खुल्या शौचापासून मुक्त झाली आहेत आणि स्वच्छता व्याप्तीमध्ये ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
यावेळी लाभार्थींनी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेच्या माध्यमातून कशाप्रकारे नागरिकांना अल्पदरातील औषधे कशी उपलब्ध होतील हे समजवून घेतले तसेच गुडघे प्रत्यारोपण आणि औषधी अपकरणांमुळे कशाप्रकारे परिणाम जाणवला याबद्दलही पंतप्रधानांना सांगितले.
 
एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी दररोज योगाभ्यास करण्याचा संदेशही यावेळी मोदी यांनी जनतेला दिला.
@@AUTHORINFO_V1@@