अजिंक्य कुलकर्णी यांना मातृशोक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |
अजिंक्य कुलकर्णी यांना मातृशोक

पुणे : येथील मिडियाविद्या संस्थेचे संचालक अजिंक्य कुलकर्णी यांच्या मातोश्री वासंती वसंत कुलकर्णी यांचे वार्धक्य व प्रदीर्घ आजारपणामुळे बुधवारी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. वासंती कुलकर्णी कित्येक वर्षे राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या होत्या. पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. वासंती कुलकर्णी यांच्या पश्चात दोन मुलगे – धनंजय व अजिंक्य, दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे.
@@AUTHORINFO_V1@@