होऊन जाऊदे एल्गार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018   
Total Views |

 
 
त्यांचा एल्गार कशासाठी? जातीअंताच्या नावाने जातीची शस्त्र परजण्यासाठी? परमपूज्य बाबासाहेबांच्या नावाने, माओला उभा करण्यासाठी? त्यांचा एल्गार कशासाठी? १ जानेवारीला महाराष्ट्रभर दंगल झाली. या दंगलींची दाहकता आणि त्यानंतर तुटत चाललेल्या समाजाचे वास्तव पाहिले, तर कोणत्याही संवेदनशील मनाला दुःख होते, पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खावे, तशी एक जानेवारीची दंगल आपल्याला पर्वणीच आहे, शक्तिप्रदर्शन करण्याचे मस्त साधनच आहे, अशा आविर्भावात काही जण खुश होते. असो, दंगलीमध्ये नक्षल्यांचा सहभाग होता आणि ते सर्वजण सुधीर ढवळे यांच्या संपर्कात होते असा पुरावा पोलिसांना मिळाला. त्या पार्श्वभूमीवर सुधीर ढवळे, अ‍ॅड. सुधींद्र गडलिंग, शोमा सेन, रोना विल्सन, महेश राऊत यांना अटक झाली.
 
नक्षलवाद्यांशी संपर्क ठेवणे आणि त्यांना वस्तू पुरविणे यासाठी यापूर्वी या सर्वांना अटक झाली होती. शिवाय त्यावेळी सरकारदेखील काँग्रेसचे होते. हा उल्लेख यासाठी की आता अटक झालेल्यांचे चेले लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील, की भाजप सरकार जातीयवादी आहे, म्हणून त्यांनी सुधीर ढवळे, अ‍ॅड सुधींद्र गडलिंग वगैरेंना अटक केली.
 
छे! वैचारिक मतभेद असतील, पण एखाद्या समाजाच्या भोळेपणाचा फायदा घेऊन, त्यांचा उपयोग आपल्या घाणेरड्या मनसुब्यांसाठी करणे हे कृत्य अभिनंदनीय आहे का? एल्गार परिषदेमधल्या सहभागी लोकांचे विचार ऐकून प्रश्न पडला होता की यांचा नक्की हेतू काय आहे? एल्गार परिषदेमध्ये सुधीर ढवळे म्हणाले होते, 'अगर बगावत ना हो, तो शहर जलके राख होना चाहिए,' बगावत करायची, पण का? कशासाठी? याचे उत्तर देतील का? म्हणूनच आता गरज आहे हा देश, देशाची संस्कृती, देशाच्या प्रत्येक घटकाला तोडू पाहणार्‍या, बरबाद करू इच्छिणार्‍यांविरुद्ध एल्गार पुकारण्याची. परमपूज्य बाबासाहेबांच्या नावावर काहीही खपवून, समाजाची अक्षम्य दिशाभूल करणार्‍या माओवाद्यांच्या नवपद्धतींविरुद्ध एल्गार छेडण्याची. अर्थात विचारांचा लढा विचारांनीच.
 
जात लागताना
 
सर्वेक्षण केले तर एक सत्य नजरेस येईल, की जातीच्या गुंत्यात कित्येक जातींची सरमिसळ झाली आहे. किती तरी इतर मागासवर्गीय किंवा भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक मागास समुदायात किंवा जातीप्रथेच्या मध्यम स्तरावर ओळख घेऊन जगत आहेत. अर्थात ’जातपात तोडो’साठी ही गोष्ट सकारात्मक आहेच म्हणा, पण या पार्श्वभूमीवर जात सोडून, इतर जात लावणार्‍यांची तगमग आणि जातीय समाजातले दुःख, ’जेव्हा मी जात चोरली होती...’ म्हणणार्‍या बाबूराव बागुलांच्या दुःखाइतकेच दुःखद आहे. या विधानावर कित्येकांच्या भुवया वक्र होतील, पण माणूस जात केवळ आरक्षणाच्या सवलती मिळवण्यासाठीच चोरतो का? नाही.
 
या महाराष्ट्रातच आलुतेदार समाजामधील कित्येक लोक कोणती जात लावत आहेत याचा शोध घेतला, तर एक वेगळेच वास्तव दिसेल. आलुतेदार समाज म्हणजे ज्यांची मदार हस्तकौशल्यावर नाही, तर वाग्देवतेवर आहे. उदाहरणार्थ भाट, गोसावी, ज्योतिषी समाज. परकीय शक्तींनी स्थानिक राजसत्ता उलटवल्यानंतर या आलुतेदारांचा राजाश्रय गेला आणि धर्मसत्ता वाचवताना ते परागंदा झाले. पूर्वीचे वैभवशाली आलुतेदार त्यांनतर मिळेल तिथे पथारी टाकून, जीवन व्यतीत करू लागले. संख्येने कमी, त्यामुळे ज्या इतर जातबांधवांच्या सोबत ते राहायचे त्यांच्यासोबत ते समरस झाले. इतके की ज्या बहुसंख्य असलेल्या जातसमुदायासोबत ते राहायचे त्यांच्या जातीनेच यांना ओळखले जाऊ लागले. त्यांनी जात चोरली नाही, जगण्यासाठी जात लागली. बाहेरच्या जगासाठी जात कोणतीही लागलेली असू दे, पण त्यांचे देवघर आणि स्वयंपाकघर मात्र पूर्वीचीच जात जगत होते आणि आहे. या अंतर्बाह्य विरोधाभासी जगण्याचा दबाव किती तरी आलुतेदार जातींच्या लोकांवर आहे. त्यांना प्रश्न पडतो आपण नक्की कोण? भारतीय माणसाला आपले मूळ नेहमीच महत्त्वाचे वाटते. आज आलुतेदार समाजातील कित्येकांना हे मूळ तुटल्याचे दुःख आहे. त्यांना कुणाला फसवायचे नव्हते, नाही. कित्येकजण तर असेही आहेत, ज्यांना कागदोपत्री लावलेल्या जातीपासून मिळणारा फायदाही नको आहे. त्यांना मूळ ओळख हवी आहे. अर्थात जातीपातीचे राजकारण नाही, तर पूर्वजांचा वारसा इथे अभिप्रेत आहे. ओबीसी राजकारण करणार्‍यांना ओबीसी प्रवर्गात मोडणार्‍या या गटाचा हा प्रश्न कधीच दिसला नाही का? इथे जातीचा उदोउदो नाही, तर एका वेगळ्या प्रश्नाचा वेध घ्यायचा प्रयत्न आहे.
@@AUTHORINFO_V1@@