मादाम तुसाद संग्रहालयात आता विराट कोहलीही दिसणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
दिल्ली : दिल्ली येथील नुकतेच काही महिन्यांपूर्वी उघडण्यात आलेले मादाम तुसाद संग्रहालयामध्ये आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा देखील दिसणार आहे. दिल्ली येथील मादाम तुसाद संग्रहालय यांनी आपल्या वेबसाईटवरून ही माहिती दिली आहे. विराटने याबद्दल मादाम तुसाद यांच्या संघाचे आभार मानले आहे. 
 
 
 
 
 
त्यामुळे आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू कपिलदेव यांच्यानंतर आता विराट कोहली याचा देखील मेणाचा पुतळा दिल्ली येथील मादाम तुसाद संग्रहालयात दिसणार आहे. या संग्रहालयमध्ये महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री करीना कपूर, अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता हृतिक रोषन, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, धावपटू मिल्खासिंग अशा दिग्गज व्यक्तींचे मेणाचे पुतळे या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत सगळ्या कलाकारांचे मेणाचे पुतळे येथे आहे.
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे माजी आणि दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दूल कलाम, हास्य कलाकार चार्ली चॅप्लीन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, गायिका आशा भोसले, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींचे मेणाचे पुतळे येथे आहे. या संग्रहालयाचे प्रवेश शुल्क मोठ्या नागरिकांसाठी ९६० एवढे असून लहान मुलांसाठी ७६० एवढे आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@